Friday, 31 August 2018

निंबोळी अर्काचे फायदे

- *निंबोळी अर्काचे फायदे -*

- *निम घटकांचा किडीवर होणारा परिणाम -*
निंबोळी मध्ये अझाडिरेक्टिन हे लिगनॉइड आहे व ते किडिंच्या शरीर क्रियेमध्ये घातक बदल करतात .
* किडिंचे झाडावरील खाणे बंद होते.
* अझाडिरेक्टिनच्या वासाने किडिंच्या माद्या दूर पळतात.
* अंडी देण्याचे टााळतात.
* किडिंच्या वाढीवर आणि कात टाकण्यावर परिणाम झाल्यामुळे अपंगत्व येऊन किडिंचा मृत्यु होतो .
* अंडी घालन्याची व उबवन्याची क्षमता कमी होते .
* किडिंचे आयुष्य कमी होऊन उड़न्याची क्षमता कमी होते .
* किडिंमध्ये नपुंसकता येऊन लिंगाकर्षण कमी होते .
* नरमादीचे मिलन होत नाही .
* सतत 3 वर्ष ज्या शेतातील पिकावर निंबोळी अर्क वापर ल्यास तेथे किडीच कमी येतात

हुमणी

*_हुमणी_*
हुमणी एक किड आहे.
हुमणीचा जीवन क्रम हा पुढील चार अवस्थांमध्ये पूर्ण होतो.

1) अंडी.
2) अळी.
3) कोष.
4) पतंग.
अळी ही मुख्य अवस्था आहे.
या अवस्थेत हुमणी खूप मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करते.
अळीचे मुख्य खाद्य झाडाची मुळे, खोडा वरची साल हे आहे.
*आता सविस्तरपणे पाहू:-*
*1) अंडी -*
° पतंग हा जमिनीत जाऊन 5cm ते 8cm वरती अंडी घालतो.
° एक पतंग साधारणतः 30 ते 50 अंडी घालतो.
° अंडी घालण्याचा कालावधी एप्रिल ते मे.
*2) अळी -*
° हि अवस्था 10 ते 11 महिन्याची असते. या अवस्थेत पहिली 3 ते 4 महिने अळीला खुप खायला लागते म्हणजेच या कालावधीत अळी पिकांना जास्त हानी पोहचवते..
*°अळी अवस्थेत तीन अवस्था असतात.*
*प्रथम अवस्था -*
°अंड्यातून नुकतीच बाहेर पडलेली अळी. या आळीचा रंग पांढरा असतो. या अळीची भूक खूप असते. हि अळी 30 ते 40 दिवस या अवस्थेत राहते.
*दुसरी अवस्था -*
° या अवस्थेत अळी थोडी मोठी झालेली असते व अळीची भूक वाढलेली असते. या अवस्थेतील अळी खूप नुकसान कारक ठरते.
ही अवस्था 45 ते 65 दिवसाची असते. या अवस्थेत अळीला खायला नाही भेटले तर ती ठराविक काळासाठी सुप्त अवस्थेत जाते. नंतर अनुकूल परिस्थितीत खायला चालु करते.
*तिसरी अवस्था -*
° या अवस्थेत अळीची पूर्ण वाढ झालेली असते. अळी जमिनीत खोलवर जाते व पांढरट पिवळसर रंगाची दिसते. इंग्लिश मधील "C" या आकाराची दिसू लागते. ती जमिनीत अर्ध गोलाकार दिसू लागते. सर्वात जास्त काळ आळी या अवस्थेत असते.
*3) कोष -*
° कोष अवस्थेत अळी 15 ते 20 दिवस असते. कोष अवस्थेतून ती पतंग अवस्थेत जाते.
*4) पतंग -*
° हि शेवटची अवस्था आहे. या अवस्थेत पतंग हा झाडाची पाने खातो. त्यात कडुलिंब, बाभुळ अशा झाडाची पाने दिवस मावळण्याच्या वेळी /मावळल्यानंतर (संध्याकाळी 6 ते 7 च्या सुमारास)खातात.
*_हुमणी व्यवस्थापन -_*
*जैविक -*
1) मेटारायजिम आणी बिव्हेरिया हे जीवाणु वापरावेत.
*नैसर्गिक -*
1)रुईचा पाला 4-5 kg घेऊन तो 20 लीटर पाण्यात उकळून घ्यावा व थंड झाल्यावर 200 लीटर पाण्यात टाकुन त्याची अळवणी करावी. (zbns)
*पारंपारिक -*
1) पिक काढणी नंतर लगेच १५-२० से.मी. खोल बलराम किंवा लाकडी नागराने नांगरट करुन घ्यावी किंवा रोटर मारावा.
2) पावसाच्या पहिल्या सरीबरोबर भूंगे जमिनीतून बाहेर येण्यास सुरुवात होते. हे भूंगे संध्याकाळी 6:30 ते 9:00 वाजेपर्यंत कडुलिंबाच्या झाडावरती असतात. हा काळ त्यांच्या मिलनाचा असतो. अशा वेळेस कडुलिंबाचे झाड हलवावे. हलवल्याबरोबर झाडावरील पतंग(हुमणी) खाली पडतील ते गोळा करा आणी अर्धा तास रॉकेल मध्ये ठेवावे. अशाने पुढचे नुकसान टाळेल.
*रासायनिक*
1) क्लोरो 2 लिटर + सायापर्मेथरिन 0.5 लिटर ड्रेचिंग किंवा पाट पाण्यातुन सोडावे. काही प्रमाणात आटोक्यात येऊ शकते.
2) बायरचे लेसेण्टा चांगले काम करू शकते. ऊस लागणी नंतर लगेच ड्रेंचिंग केल्यास चांगला परीणाम मिळतो आणि ऊसाची वाढ देखिल उत्तम होते .
3)सुमिटोमो यांचे DANTOTSU 100 ग्रॅम उत्तम आहे.
4) लेसेंटा २०० ग्रॅम व डेसिस १०० - २५० मिली ४०० लिटर पाण्यातुन आळवणी करावी .
*टीप - रासायनिक औषधे शेवटचा पर्याय म्हणून वापरावीत. कारण रसायनांमुळे जमिनीतील गांडूळ मरण पावतात. तसेच इतर उपयोगी जीव -जिवाणूंचा समूळ नाश होतो.*
मार्गदर्शक -
डॉ. वाय्. टी. जाधव
(Asst. Prof. Deparmnt of Entomolgy,
College of Agriculture, Akluj.)

Sunday, 26 August 2018

सुर्यफुल
#शेतकरी_जगवा_देश_वाचवा.
#join_agriinfo
https://m.facebook.com/agriinfo143/?ref=bookmark
जमीन

      सूर्यफुल लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी. आम्लयुक्त आणि पाणथळ जमिनीत हे पीक चांगले येत नाही.

पूर्वमशागत

      जमीनीची खोल नांगरट करुन त्यानंतर कुळवाच्या उभ्या आडव्या दोन ते तीन पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवाच्या पाळीपूर्वी हेक्टरी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत घालावे.

पेरणी हंगाम

      खरीप – जुलै पहिला पंधरवडा, रब्बी – ऑक्टोंबर पहिला पंधरवडा ते नोव्हेंबर पहिला पंधरवडा उन्हाळी – फेब्रुवारी पहिला पंधरवडा.

पेरणीचे अंतर

      मध्यम ते खोल जमीन – ४५ X ३० सें.मी., भारी जमीन – ६० X ३० सें.मी. तसेच संकरित वाण आणि जास्त कालावधीच्या वाणाची लागवड ६० X ३० सें.मी. अंतरावर करावी.

पेरणी पध्दत

      कोरडवाहू सुर्यफूलाची पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी म्हणजे बी आणि खत एकाच वेळी पेरता येते. बियाणे ५ सें.मी पेक्षा जास्त खोल पेरू नये. बागायती पिकाची लागवड सरी वरंब्यावर टोकण पद्घतीने करावी.

बियाणे

      सुर्यफूलाच्या पेरणीसाठी सुधारित वाणाचे ८-१० किलो बियाणे आणि संकरित वाणाचे ५ ते ६ किलो बियाणे प्रति हेक्टरी वापरावे.

बीजप्रक्रिया

      मर रोगाच्या प्रतिबंधासाठी २ ते २.५ ग्रॅम थायरम किंवा ब्रासिकॉल प्रतिकॉल प्रतिकिलो बियाण्यास चोळावे. केवडा रोग टाळण्यासाठी ६ ग्रॅम अॅप्रॉन ३५ एस.डी.प्रति किलो बियाण्यास चोळावे. तसेच विषाणूजन्य (नॅक्रॉसिस) रोगाच्या प्रतिबंधासाठी इमिडॅक्लोप्रिड ७० डब्लू. ए.गाऊचा ५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावावे. त्यानंतर अॅझोटोबॅक्टर हे जिवाणू खत २५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास पेरणीपूर्वी लावावी.



सूर्यफुल पिकाचे वाण

वाणाचे नाव

कालावधी (दिवस)

सरासरी उत्पादन (क्वि./हे.)

वैशिष्टये

सुधारित जाती

एस.एस.५६

८०-८५

१०-११

कमी कालावधी, उशिरा पेरणीस योग्य, दुबार, आंतरपीक पध्दतीस व अवर्षण प्रवण भागास योग्य.

मॉर्डन

८०-८५

८-१०

कमी कालावधी, बुटकी,उशिरा पेरणी, दुबार आंतरपिकास योग्य

ई.सी.६८४१४

१००-११०

१०-१२

अधिक उत्पादनक्षम, उशिरा पेरणीस योग्य, खरीपासाठी चांगली

भानू

८५-९०

१२-१३

सर्व हंगामासाठी तसेच अवर्षणप्रवण विभागासाठी योग्य

संकरित वाण

के.बी.एस.एच.१

८५-९०

१२-१५

तेलाचे प्रमाण अधिक, अधिक उत्पादन

एल.एस.एफ.एच. १७१

९०

१८-२०

केवडा रोगास प्रतिबंधक, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्यात कोरडवाहू वा बागायती हंगामासाठी

एल.एस.एफ.एच. ३५

८०-८५

१६-१८

केवडा रोगास प्रतिबंधक तेलाचे प्रमाण अधिक (३७ टक्के)

एल.एस.एफ.एच. ०८

९०

१२-१४

कोरडवाहू विभागासाठी, केवडा रोगास प्रतिबंधक

के.बी.एस.एच. ४४

९०-९५

१४-१६

अधिक उत्पादन क्षमता

फुले रविराज

९०-९५

१७-२०

पश्चिम महाराष्ट्रात खरीप हंगामात उशिरा पेरणीसाठी प्रसारीत केलेला अधिक उत्पादन देणारा संकरित वाण. बड नेक्रॉसीस रोगास प्रतिकारक्षम

एम.एस.एफ.एच. १७

९०-९५

१८-२०

केवडा रोगास प्रतिबंधक, महाराष्ट्रात खरीप व रबी हंगामात कोरडवाहू व बागायती लागवडी करिता शिफारस केली आहे.



आंतरपिक

      `आंतरपीक पध्दतीत सुर्यफूल + तूर (२:१ किंवा २:२) आणि भूईमूग + सुर्यफूल (६:२ किंवा  ३:१) या प्रमाणात ओळीने पेरणी केल्यास उत्पादनात चांगली वाढ होते.

रासायनिक खते

कोरडवाहू विकास प्रति हेक्टरी २.५ टन शेणखत तसेच ५० किलो नत्र, २५ किलो स्फरद आणि २५ किलो पालाश पेरणीच्या वेळेस दोन चाड्याच्या पाभरीने पेरून द्यावे. बागायती पिकास प्रति हेक्टरी ६० किलो नत्र + ३० किलो स्फूरद + ३० किलो पालाश द्यावे. यापैकी ३० किलो नत्र व संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीच्या वेळी द्यावे व उरलेल्या ३० किलो नत्राची मात्रा पेरणीनंतर एक महिन्याच्या आत द्यावी. गंधकाची कमतरता असलेल्या जमिनीसाठी प्रति हेक्टरी २० किलो गंधक पेरणीच्या वेळी गांडूळ खतातून द्यावे.

आंतरमशागत

पेरणीनंतर १५-२० दिवसांनी दोन रोपातील अंतर ३० सें.मी ठेऊन विरळणी करावी. पेरणीनंतर १५ दिवसांनी एक खुरपणी करावी तसेच दोन कोळपण्या कराव्यात. पहिली कोळपणी पेरणीनंतर २० दिवसांनी व दुसरी कोळपणी ३५ ते ४० दिवसांनी करावी.

पाणी व्यवस्थापन

सुर्यफूलाच्या पिकास संवेदनक्षम अवस्थेत पाणी देणे अत्यंत गरजेचे आहे. सुर्यफूलाच्या संवेदनक्षम अवस्था १) रोप अवस्था २) फुलकळी अवस्था ३) फुलो-याची अवस्था. ४) दाणे भरण्याची अवस्था व संवेदनशील अवस्थेत पाण्याचा ताण पडू देऊ नये. फुलकळी अवस्था ते दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास दाणे पोकळ राहतात व उत्पादनात घट येते.

पीक सरंक्षण

विषाणूजन्य रोग हा रस शोषणा-या फुलकिड्यांमार्फत होतो. त्यांच्या नियंत्रणासाठी इमिडोक्लोप्रिड २०० एस.एल. २ मिली/१० लीटर पाणी या प्रमाणात पेरणीनंतर १५ दिवसांच्या अंतराने तीन वेळा फवारण्या कराव्यात. मावा व तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट ३० प्रवाही ०.०३ टक्के फवारावे. घाटे अळीच्या नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही १००० मिली ५०० लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी वापरावे. केवळ अळीच्या नियंत्रणासाठी अळ्यांचे पुंजके वेचून रॉकेल मिश्रीत पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा.





जैविक किड नियंत्रण

सुर्यफूलावरील पाने खाणारी अळी, केसाळ अळी, घाटे अळी यांच्या नियंत्रणासाठी एच.एन.पी.व्ही.या विषाणूची फवारणी करावी.

काढणी

सुर्यफूलाची पाने, देठ व फूलाची मागील बाजू पिवळी झाल्यानंतर पिकाची कापणी करावी. कणसे चांगली वाळवून नंतर मळणी करावी.

उत्पादन

कोरडवाहू पिकापासून प्रति हेक्टरी ८ ते १० क्विंटल, संकरित वाणापासून १२ ते १५ क्विंटल आणि बागायती/संकरित वाणापासून प्रति हेक्टरी १५ ते २० क्विंटल उत्पादन मिळते.

विशेष बाब

पीक फुलो-यात असताना सकाळी ७ ते ११ या वेळेत हाताला तलम कापड गुंडाळून फुलाच्या तबकावरुन हळूवार हात फिरवावा म्हणजे कृत्रिम परागीभवन होऊन दाणे भरण्याचे प्रमाण वाढते. सुर्यफूलाचे फुल उमलण्याच्या अवस्थेत व त्यानंतर आठ दिवसांनी २ ग्रॅम बोरॅक्स प्रति लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी. त्यामुळे दाणे भरण्याचे प्रमाण व दाण्याचे वजन वाढते. परागीभवन होण्यासाठी प्रति हेक्टरी ४-५ मधमांश्याच्या पेट्या ठेवावेत. सुर्यफूल पिकाची फेरपालट करावी. सुर्यफूलाची मुळे जमिनीत खोलवर जातात. दरवर्षी त्याच जमिनीत वारंवार हे पीक घेतल्यास जमिनीचा पोत बिघडून उत्पादन क्षमता कमी होते. तसेच रोग व किडीचा प्रादुर्भाव वाढतो. त्यासाठी कमीत कमी तीन वर्षे तरी त्याच जमिनीत सुर्यफुलाचे पीक घेऊ नये. तसेच कडधान्य सुर्यफूल  किंवा तृणधान्य सुर्यफूल या प्रमाणे पिकाची फेरपालट करावी. पीक फुलो-यात असताना किटकनाशकाची फवारणी करु नये. अगदीच आवश्यकता असेल तर किटकनाशकाची फवारणी करावी.

Wednesday, 22 August 2018

Liked on YouTube: मुंग की उन्नतशील खेती/cultivation of Vigna radiata or Green Gram - agri info

मुंग की उन्नतशील खेती/cultivation of Vigna radiata or Green Gram - agri info

मुंग की उन्नतशील खेती के विभिन्न आयामों जैसे खेत की तैयारी , बीज दर एवं बुवाई का समय, बीजोपचार, बुवाई की विधि एवं पौध संख्या, खाद एवं उर्वरक, सिंचाई, खरपतवार नियंत्रण, कीट प्रबंधन, रोग प्रबंधन, उपज आदि विषयों पर विडियो में चर्चा की गयी है | पूरी जानकारी हेतु विडियो देखे ....... agri info - working for peace and zero hunger please support us from your like, share and subscription.... facebook - https://ift.tt/2ORvHJy youtube - https://m.youtube.com/channel/UCoe2O1... my others videos – मटर की उन्नतशील खेती/cultivation of Pisum sativum or pea - https://youtu.be/iEFe1sjx4kA मसूर की उन्नतशील खेती/cultivation of lentil or Lens esculentum https://youtu.be/oIqiDsPb_WU अरहर की उन्नतशील खेती/ cultivation of pigeon pea or red gram or arhar - https://youtu.be/LJwecouLyYo चने की उन्नतशील खेती/ cultivation of chickpea or gram - https://youtu.be/Za5NbaBcepc care and management of goat / बकरी पालन की आवश्यक शर्ते / बकरी की देखभाल और प्रबंधन - https://youtu.be/-fqb-8AqmSs Livestock insurance scheme / पशुधन बीमा योजना / Pashudhan bima yojana - https://youtu.be/Nur175vwNx8 why am i called as vivekanand / मुझे लोग क्यों विवेकानंद कहते है ...??? - https://youtu.be/oaEmYQnai1U communal violence report of India - 2017 - https://youtu.be/ETGQTjiNhjA women contribution in agriculture - https://youtu.be/ZV8kQt8_0VI summary of current healthcare system of India in Hindi - https://youtu.be/U91uLtDMQAI
via YouTube https://youtu.be/SIPawsgWEsI

Saturday, 11 August 2018

Liked on YouTube: How to cut a tire and make it into a garden pot.wmv

How to cut a tire and make it into a garden pot.wmv

In this video show you how easy is to cut a tire and some creative idea that how people make with them. Hopefully you get motivated and start using this idea in your garden. I suggested to use a utility knife, it is a lot more easy with it that whit a regular kitchen knife, i tried this after the video. video that shows how to flip the tire one person job https://www.youtube.com/watch?v=j4U3i...
via YouTube https://youtu.be/7jrrqmz9j00

Monday, 16 July 2018

खतांमधील भेसळ ओळखा.

*खतांमधील भेसळ ओळखा*

शेती उत्पन्न वाढीसाठी शेतकरी बांधव बरेच वेळेस कर्ज काढून खते आणतात पण बरेच वेळेला आपणास मिळालेली खते योग्य आहेत का ? ही तपासणी गरजेची असते.

_*खते तपासणी -*_
*१. युरिया :*
तपास नळीत १ gm युरिया, ५ ते ६ थेंब सिल्व्हर नायट्रेट, ५ ml डिस्टिल्ड वॉटर मिसळुन ढवळल्यास द्रावण पांढरे झाल्यास भेसळ आहे.

*२. युरिया :*
१ gm युरिया तपास नळीत गरम केल्यास संपुर्ण युरिया विरघळला नाही तर भेसळ आहे.

*३. DAP :*
१ gm DAP खत, ५ ml डिस्टिल्ड वॉटर, ०१ ml आम्ल मिसळून हलवा. संपुर्ण DAP विरघळला नाही तर भेसळ आहे.

*४. म्युरेट ऑफ पोटॅश :*
०१ gm खत, १० ml पाणी तपासनळीत घेऊन हलवून पाहिल्यास बरेच कण तरंगत असतील तर भेसळ आहे.
याशिवाय
पेटत्या निखाऱ्यावर खत टाकल्यानंतर निखारा पिवळा झाल्यास भेसळ समजावी.

*५. सिंगल सुपर फॉस्फेट :*
१ gm खत, ५ ml डिस्टिल्ड वॉटर मिश्रण गाळून घ्या. नंतर त्यामध्ये १ थेंब (२%) डिस्टिल्ड अमोनिअम हैड्रोक्साइड आणि १ ml सिल्व्हर नायट्रेट मिसळले तर द्रावनास पिवळा रंग न आल्यास भेसळ समजावी.

*६. फेरस सल्फेट :*
१ gm खत आणि ५ ml पाणी मिसळा त्यात १ ml पोटॅशिअम फेरोसिनाईड मिसळल्यास मिश्रण निळे बनेल अन्यथा भेसळ समजावी.

सोयाबीन :तण नियंत्रण.

*सोयाबीन :तण नियंत्रण*

आजवर आपण जून-जुलै महिन्यात सोयाबीन पिकासाठी आवश्यक पूर्व मशागत, पेरणी, खते, वाणांची निवड इ. महत्त्वाच्या बाबींची माहिती घेतली. परंतू, या घटकांबरोबरच सोयाबीनचे चांगले उत्पादन घेण्यासाठी पि‍काव्यतिरिक्त उगवणार्‍या तणांचे शास्त्रोक्त पद्धतीने नियंत्रण करणे आवश्यक असते. या भागामध्ये आपण सोयाबीन पि‍कामधील तण व्यवस्थापनाची माहिती घेणार आहोत. 

*तण व्यवस्थापन* : सोयाबीन पीक खरीप हंगामामध्ये घेतले जाणारे पावसाळी पीक आहे, त्यामुळे शेतामध्ये पीक उभे असताना सोयाबीनच्या झाडांसोबतच आवश्यक नसणारे इतर पिके (मागील हंगामातील) व तणांची मोठ्या प्रमाणावर उगवण होते व झपाट्याने वाढ होते. सोयाबीनची उगवण झाल्यापासून पिकाची कापणी होईपर्यंत तण पिकाला अपायकारक असते. पिकामध्ये वाढणारे तण सोयाबीनशी पोषण अन्नद्रव्ये, पाणी, वाढीसाठी आवश्यक जागा, सूर्य प्रकाश इत्यादींसाठी स्पर्धा करते, त्याचा परिणाम कमी उत्पादन येण्यात होतो. तणांमुळे सोयाबीन पिकामध्ये किडी व रोगांचे प्रमाण वाढून त्यांचे नियंत्रण व मशागतीच्या कामांमध्ये अडथळा निर्माण होऊन तण नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजनांमुळे उत्पादन खर्च वाढतो. काढणीच्या वेळी वाढलेल्या तणांमुळे अडथळा निर्माण होतो तसेच त्यांचे बी पिकाच्या बियांसोबत मिसळले जाते त्यामुळे सोयाबीनच्या बियाण्याची गुणवत्ता कमी होते. सोयाबीन पिकामध्ये येणार्‍या तणांचे योग्य वेळी नियंत्रण न केल्यास उत्पादनात सरासरी ३० ते ४० टक्के पर्यंत घट येऊ शकते. त्यामुळे सोयाबीनची पेरणी करून यशस्वी उगवण झाल्यानंतर सुरुवातीच्या २०-४५ दिवसांच्या कालावधीमध्ये तणांचे योग्य नियंत्रण फार महत्वाचे असते. सोयाबीन पिकामध्ये- हरळी, लव्हाळा, चिकटा, चिमणचारा, केणा आणि पिवळी तिळवण इ. एकदल वर्गीय तर गाजरगवत, हजारदाणी, एकदांडी, रेशीमकाटा, तांदुळजा, पाथरी, दुधी इ. द्विदल वर्गीय  तणे आढळतात.

*सोयाबीन मधील तण नियंत्रणासाठी खालील उपाय योजनांचा अवलंब केल्यास फायदेशीर ठरते :*
१) मनुष्य बळ वापरून खुरपणी किंवा कोळपणी करणे: सोयाबीन पीक रोप आवस्थेमध्ये असताना त्याची वाढ सावकाश होत असते या वेळी तणांचा प्रादुर्भाव झाल्यास रोपांची वाढ खुंटते व पीक अपेक्षेप्रमाणे निरोगी व सुदृढ येत नाही. पीक फुलोर्‍यापर्यंत तणविरहित ठेवणे उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. त्यासाठी पहिली खुरपणी पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी आणि दुसरी खुरपणी पेरणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी करावी किंवा पिकातील तण उपटून त्याचे पिकामध्येच आच्छादन करावे. किंवा खुरपणीसाठी मजूरांची कमतरता असल्यास तणांचा प्रादुर्भाव पाहून ४० ते ४५ दिवसांपर्यंत कुळवाच्या दोन पाळ्या बैल किंवा सायकल कोळप्याच्या सहाय्याने घालाव्यात.
२) रासायनिक तणनाशक वापरून: पडणार्‍या पावसामुळे किंवा मजुरांअभावी खुरपणी किंवा कोळपणी करणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत तण नाशके वापरुन वेळीच तणांचा बंदोबस्त करता येतो. पेरणीपूर्वी, तण उगवण्यापूर्वी व उगवल्यानंतर वापरायची तण नाशके वेगवेगळी असतात. त्यामुळे तण नाशक वापराचे नियोजन पेरणी पूर्वी करणे गरजेचे असते. खाली दिल्याप्रमाणे सोयाबीनमधील तण नियंत्रणासाठी एका तण नाशकाचा वापर करावा.
अ) *पेरणीपूर्वी तण नाशक वापरुन:*
अ.नं. तण नाशकाचे सामान्य नाव व्यापारी नाव मात्रा व्यापारी घटक (प्रती हे.) फवारणी
१. फ्लुक्लोरॅलिन ४५ ईसी बासालीन २.०० ली. दिलेली मात्रा ७०० ते ८०० ली./हे पाण्यामध्ये मिसळून जमिनीवर फवारावी व कुळवाची एक पाळी देऊन जमिनीत चांगली मिसळावी व नंतर पेरणी करावी.

      आ) बी उगवण्यापूर्वी तण नाशक वापरुन:
अ.नं. तण नाशकाचे सामान्य नाव व्यापारी नाव मात्रा व्यापारी घटक (प्रती हे.) फवारणी
१. पेंडिमेथिलीन ३० ईसी स्टॉम्प ३.३ ली. यांपैकी एका तण नाशकाची दिलेली मात्रा ७०० ते ८०० ली./हे पाण्यामध्ये मिसळून पेरणीनंतर ताबडतोब परंतू ४८ तासांच्या आत जमिनीवर फवारावी.
२. डिक्लोसुलाम ८४% ड्ब्लुडीजी स्ट्रॉंगार्म ३२ ग्रॅम
       इ) बी उगवल्यानंतर तण नाशक वापरून:
अ.नं. तण नाशकाचे सामान्य नाव व्यापारी नाव मात्रा व्यापारी घटक (प्रती हे.) फवारणी
१. इमॅझेथ्यापिर १० टक्के एसएल परस्यूट १ ली. यांपैकी एका तण नाशकाची दिलेली मात्रा ५०० ते ७०० ली./हे पाण्यामध्ये मिसळून पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी  तणांना २-४ पाने असताना तणांवर फवारावी.
२. क्विझ्यालोफॉप इथिल ५ टक्के इसी टर्गा सुपर १ ली.

३) एकात्मिक तण व्यवस्थापन: सोयाबीन पिकातील एकात्मिक तण व्यवस्थापन करण्यासाठी  बी उगवण्यापूर्वी वापरवायचे कोणतेही एक तण नाशक फवारावे आणि ३० ते ३५ दिवसांनी खुरपणी किंवा कोळपणी करावी.
शिफारस केल्याप्रमाणे दोन ओळींतील अंतर ४५ सें.मी. व दोन झाडांमधील अंतर ५-७ सें.मी राहील अशी पेरणी केल्यास हेक्टरी ४ ते ४.५ लाख एवढी झाडांची संख्या राखली जाते. त्यामुळे जर पीक उगवण्यापूर्वी किंवा पिकाच्या सुरुवातीच्या कालावधीस तण नाशक वापरले तर तण उगवून येत नाही. ३०-३५ दिवसांनी एक कोळपणी केल्यानंतर पिकातील सर्व रिकामी जागा सोयाबीनच्या झाडांनी व्यापली जाते. त्यामुळे नंतर पीकाच्या कालावधीत तणांचा उपद्रव आपोआप कमी होतो. अशा प्रकारे सोयाबीन पिकातील तण नियंत्रण केल्यास उत्पादन वाढण्यास मदत होते.


कामगन्ध सापळ्याची जादू.

* कामगन्ध सापळ्याची जादू*

1) पहिल्या पावसानंतर गुलाबी बोंड अळिचे पतंग कोषाव्स्थेतून बाहेर पडले असुन नर पतंग कामगन्ध सापळ्यतील कामगन्धामुळे त्यात अडकत असल्याचे दिसुन येते.

2) यावरुन आपल्या परिसरात गुलाबी बोंडअळिचे जिवनचक्र सुरु झाले असल्याने कापसामधे सर्व शेतकरी बांधवांनी आताच कामगन्ध सापळे लावल्यास गावामधे नर पतंगाची मास ट्रपींग करुन किडीची संख्या कमी करता येइल.

3) फुलोरा अवस्था येण्यापूर्वी हे पतंग कामगन्ध सापळ्यात पकडून मारल्यास त्याचे प्रजनन कमी हाऊन किडीच्या संख्यावर काही प्रमाणात मात करता येइल व फुलोरा ,पाते अवस्थेत गुलाबी बोंड आळीचा प्रादुर्भाव कमी करता येइल.

4) फुलोरा,पाते अवस्थेत गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी असल्यास पुढे प्रादुर्भाव कमी रहातो.

 *कामगन्ध सापळ्याचा वापर*

1) कामगन्ध सापळा किमंत - रु 40 / सापळा

2) एकरी 10 सापळे पिकापेक्षा
 1फुट उंचीवर लावावेत.

3) एकरी 10 सापळ्यास रु 400 खर्च येइल.

4) दर 35 ते 50 दिवसानी सापळ्यतील ल्युर बदलने आवश्यक.

5) सतत 3 दिवस 8 पतंग सापळ्यात आढळल्यास आर्थिक नुकसानिची पातळी ओलांडली असे समजून 35-45 व्या दिवशी पाते फुले अवस्थेत 5% निंबोळी अर्काचि फवारणी करावी.

           

जिवाणू व जैविक बुरशीबाबत माहिती.

*जिवाणू व जैविक बुरशीबाबत माहिती* :---
    *******************************

*नत्र स्थिर करणारे जिवाणू* :---
     **********************

यात चार प्रकारचे नत्र स्थिर करणारे जिवाणू आहेत.

हे हवेतील मुक्त नत्र शोषून घेवून पिकांना उपलब्ध करून द्यायचे काम करतात.

1] *सहयोगी जिवाणू*:--
       ***************

*अॅसिटोबॅक्टर आणि रायझोबियम* यांचा
------------------         -----------------   

समावेश होतो.

यांना नत्र स्थिर करण्यासाठी रोपांची गरज असते.

हे रोपांच्या मुळात शिरून मुळावर गाठी निर्माण करतात व त्याद्वारे नत्र स्थिर करतात.

2] *सह-सहयोगी* :--
       *************

या पध्द्तीत जिवाणू *अझोस्पायरीलम* मुळामध्ये प्रवेश करून नत्र स्थिर करतात.

3] *असहयोगी* :---
       **********

या प्रकारात जिवाणू *अॅझोटोबॅक्टर* जमिनीत स्वतंत्र राहून नत्र स्थिर करतात.

*यांच्या वापरामुळे रासायनिक खतामध्ये 25-30% बचत होते.

**प्रमाण :---
  *******

२ मिली प्रति एकर.

*स्फुरद विरघळवणारे जिवाणू :---*
     *************************

स्फुरद विरघळवणारे जिवाणू *बॅसिलस मॅगाटेरीयम व्हार फाॅस्फरियम* हे जमिनीतून सेंद्रिय कर्बावर जगून वाढीदरम्यान सेंद्रिय आम्ल तयार करून जमिनीतील फाॅस्फरस विरघळवण्याचे कार्य करून पिकांना उपलब्ध करण्याचे काम करतात.

*यांच्या वापरामुळे मुळांची वाढ होण्यास मदत होते.

तसेच वाढ होणारे हार्मोन तयार करतात.

*यांच्या वापरामुळे रासायनिक खतांची 25-30% बचत होते.

**प्रमाण :---
   *******

 प्रति एकर.

*पोटॅश सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया*:---
     *****************************

हे जिवाणू *फ्रच्युरिया ऑरेन्शिया* जमिनीत वाढ होत असताना जमिनीतील पोटॅश विघटन करण्याचे काम करतात व पोटॅश जमिनीत उपलब्ध स्वरूपात पिकांना पुरवितात.

*यामुळे पिकांचे उत्पादन, रोगप्रतिकारशक्ती, रंग, साठवणूक क्षमता वाढते.

*यामुळे रासायनिक खतांची 25-30% बचत होते.

**प्रमाण :---
   ******

२ मिली प्रति एकर.

***स्फुरद विरघळवणारे जिवाणू :---
     ************************

हे जिवाणू *थायोबॅसिलस थायोक्सीडन्स्* हे जमिनीतील स्थिर सल्फर विद्राव्य करून पिकांना उपलब्ध करून द्यावयाचे काम करतात.(सल्फेट फाॅर्म)

या प्रक्रियेला ऑक्झीडेशन प्रोसेस म्हणतात.

*2S + 3O2 + H2O --> 2H2SO4*

*या जिवाणूमुळे जमिनीचा जास्त पी.एच कमी करण्यास मदत होते.

*यामुळे पिकांच्या फळांची गोडी, रंग येण्यास मदत होते.

**प्रमाण :---
   *******

 प्रति एकर.

***पॅसीलोमायसीस :---
     ***************

*ही बुरशी पॅसीलोमायसीस लिलॅसीनस ही सुत्रकृमीच्या संपर्कात येताच ( अंडी, कोष, अळी) त्यांचे बीजाणू अंकुरतात आणि त्यांना पॅरालिसीसचा अॅटॅक येऊन त्यांचा मृत्यू होतो.

*सूत्रकृमीमुळे मध्यम आकाराच्या गाठी तयार होऊन मुळाच्या अन्नद्रव्य शोषून घेण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणतात.

*सूत्रकृमीच्या प्रामुख्याने डाळींब, संत्रा, द्राक्ष, बोर, टोमॅटो, वांगी, भाजीपाला इ. पिकांवर आळून येतो.

**प्रमाण :---
   ******

जमिनीतून २मिली  प्रति एकर.

*व्हर्टीसीलीयम* :---
    *************

*ही व्हर्टीसीलीयम लेकॅनी बुरशी असून ती रस शोषणाऱ्या किडीच्या संपर्कात येताच त्यांचे बीजाणू अंकुरतात व कीटकांच्या शरीरात प्रवेश करून आतील जीवनरसावर वाढतात.

त्यामुळे किडीच्या चयापचायातील संप्रेरके नष्ट होतात.

ज्यामुळे किडीला अंपगत्व येऊन किडीचा मृत्यू होतो.

*रस शोषणाऱ्या किडी, मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फूल किडे, मिलीबग इ.यांच्या नियंत्रणास वापरण्यास योग्य आहे.

**प्रमाण :---
   *******

*फवारणी----  २ मिली १०० लिटर. पाण्यासाठी

*जमिनीतून---- २मिली  एकर.

*बिव्हेरीया बॅसीयाना* :---
    *********

*ही बुरशी बिव्हेरीया बॅसीयाना किडीच्या संपर्कात येताच त्याचे बिजाणू अंकुरतात व कीटकाच्या शरीरात प्रवेश करून आतील जीवनरसावर वाढतात.

त्यामुळे चयापचयातील संप्रेरके नष्ट होतात.

त्यामुळे कीडींना अपंगत्व येऊन त्यांचा मृत्यू होतो.

*हे कठीण कवच असलेल्या किडीवर अत्यंत प्रभावी नियंत्रण करते.

बोंडअळी, शेंडअळी, उडद्या, हिरवी अळी, फळ पोखरणारी अळी, हुमणी इ.

**प्रमाण :---
   ******

*फवारणी ---- 2 मिली 100 लीटर पाण्यासाठी

*जमिनीतून ---- 2 मिली एकर.

*मेटाॅरायझीयम* :---
     *************

*ही बुरशी मेटाॅरायझीम अॅनीसोप्ली किडीच्या संपर्कात येताच त्यांचे बिजाणू अंकुरतात व कीटकांच्या शरीरात प्रवेश करून आतील जीवन रसावर वाढतात.

त्यामुळे चयापचयातील संप्रेरके नष्ट होतात.

त्यामुळे किडींना अपंगत्व येऊन त्यांचा मृत्यू होतो.

*हे वाळवी, हुमणी, खोडकिडी, मिलीबग, पांढरी माशी इ. करिता अत्यंत प्रभावी नियंत्रण करते.

**प्रमाण :---
  *******

*फवारणी ---- २ मिली १०० लिटर. पाणी

*जमिनीतून ---- २ मिली प्रति एकर.

*ट्रायकोडर्मा* :---
    ***********

* ट्रायकोडर्मा हारझीरीयम या बुरशी असून या मर, मूळकूज, खोडकूज, फळकूज रोग नियंत्रण करण्याकरिता उपयोग होतो.

*या बुरशी हानीकारक बुरशी ( फायटोप्थोरा, पिथीयम, फ्युजेरियम, स्केलेरेशीयम व रायझोक्टोनिया तंतूभोवती गुंडाळले जातात व त्यातील अन्नद्रव्ये शोषून घेतात.

परिणामी हानीकारक बुरशी मरतात.

या बुरशी काही प्रकारची एनझाईम निर्मिती करतात.

जी हानीकारक बुरशींना प्रतिबंध करतात.

**प्रमाण :---
   *******

*फवारणी* ---- 2 मिली 100 लिटर. पाणी

*जमिनीतून* ---- 2 मिली प्रति एकर

*स्यूडोमोनास फ्लूरोसन्स* :---
    ***********

*हे स्यूडोमोनास फ्लूरोसन्स् सूक्ष्म जिवाणू असून हे एक उत्तम जैविक बुरशीनाशक तसेच पिकवाढ संवर्धक आहे.

*हे अणुजीवजन्य रोग, मर, मूळकुज, करपा, झाॅन्थोमोनास, फळ व पानावरील काळे डाग यावर उपयुक्त आहे.

*हे हानीकारक बुरशीच्या संपर्कात येताच त्याची वाढ झपाट्याने होऊन त्यांच्याभोवती गुंडाळले जातात व त्यातील अन्नद्रव्ये शोषून घेतात.

परिणामी हानीकारक बुरशी मरतात.

**प्रमाण :---
  *******

*फवारणी* ---- 2 मिली 100 लिटर.

*जमिनीतून* ---- 2 मिली  प्रति एकर.

***बॅसिलस सबटीलीस *:---
    *********

*हे बॅसीलस सबटिलीस हे सूक्ष्म जिवाणू असून ते एक अत्यंत प्रभावी बुरशीनाशक आहे.

*अणुजीवजन्य रोग, मर, मूळकुज, पानावरील करपा, झाॅन्थोमोनास, फळ व पानांवरील काळे डाग यावर चांगले प्रभावी आहे.

*हे हानीकारक बुरशीच्या संपर्कात येताच त्यांची वाढ झपाट्याने होऊन त्यांच्याभोवती गुंडाळले जातात व त्यातील अन्नद्रव्ये शोषून घेतात.

परिणामी हानीकारक बुरशी मरतात.

याच्या वापरामुळे पिकांमध्ये वाढ संवर्धक एन्झाईम् तयार होण्यास मदत होते.

**प्रमाण :---
  *******

*फवारणी* ---- 2.5 ग्राम  प्रति लिटर

*जमिनीतून* ----1 किलो प्रति

*मायकोरायझा :---*  *Vam*
    *************

* ही व्हॅसीकुलर अरबूसक्युलर मायकोरायझा बुरशी असून हे वनस्पतीच्या मुळांमध्ये सहयोगी जीवन जगत असतात.

* मायकोरायझा हे मुळांच्या आत तसेच बाहेर राहून मुळातील अन्नद्रव्य, कार्बोहायड्रेटस्, अॅमिनो अॅसिड, व्हिटाॅमीन शोषून घेतात.

त्याबदल्यात ते मुळांना फाॅस्फरस, झिंक, पाणी इ. वाहून नेऊन देण्याचे काम करतात.

* या बुरशीमुळे जमिनीतील हानीकारक बुरशी, निमॅटोड, पाण्याचा ताण यांना प्रतिबंध करते.

* या बुरशीमुळे मुळांची वाढ होण्यास मदत होते.

**प्रमाण :---*
  *******

सर्व पिके ---- 100 ग्राम प्रति एकर.

उद्योगासाठी शासनाच्या विविध वित्त- कर्ज आणि अनुदान योजना.

उद्योगासाठी शासनाच्या विविध वित्त- कर्ज आणि अनुदान योजना




जिल्हा उद्योग केंद्र

जिल्हा उद्योग केंद्र हे प्रत्येक जिल्ह्याच्या इथे राज्य शासनाने उभे केलेले शासकीय कार्यालयांचे जाळे आहे.

जिल्हा उद्योग केंद्रात उद्योजकांसाठी खालील सुविधा उपलब्ध असतात:

 १. लघु-मध्यम उद्योग म्हणून नोंदणी

२. उद्योजकता विकास प्रशिक्षण

 २. वित्त योजना-

      १. प्रधानमंत्री रोजगार योजना

      २. बीज भांडवल योजना

      ३. जिल्हा उद्योग केंद्र योजना

वित्त योजना:

१. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना:

योजना राबवणाऱ्या संस्था:

१. जिल्हा उद्योग केंद्र

२. खादी व ग्रामोद्योग मंडळ (KVIC)

प्रकल्प मर्यादा:

उत्पादन:- रू. २५ लाख

सेवा व व्यवसाय: रु. १० लाख

 आर्थिक मदत:

                                            स्वतःची गुंतवणूक    बँक कर्ज                      अनुदान

                                                                                                शहरी भाग    ग्रामीण भाग

सर्वसाधारण संवर्ग:                          १०%                 ९०%                  १५%            २५%

अनुसूचित जाती जमाती,

अल्प्संख्यान, इतर मागासवर्गीय          ५%                ९५%                २५%              ३५%

माजी सैनिक, महिला, अपंग

पात्र लाभार्थी:

१. व्यक्ती

२. नोंदणीकृत सामाजिक संस्था

३. स्वयं सहाय्यता गट- बचत गट

पात्रता:

प्रकल्प – उत्पादन रु. १० लाखापेक्षा अधिक आणि सेवा रु. ५ लाखापेक्षा अधिक असल्यास किमान आठवी उत्तीर्ण.

वय : किमान १८ वर्षे

इतर कुठल्याही अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.

केवळ नवीन उद्योजल, कारागीर संस्था पात्र.

कागदपत्रे:

१. अर्ज (२ प्रती)

२. प्रकलप अहवाल

३. शैक्षणिक कागदपत्रे

४. अनुभव किंवा प्रशिक्षण

५. जातीचे प्रमाणपत्र, आवश्यक असल्यास

६. मशिनरी अवजारे दरपत्रके

७. ग्रामपंचायत- न- हरकत दाखला

८. विद्युत पुरवठा उपलब्ध असल्याचा पुरावा, अवश्याज असेल तिथे

९. भाड्याची जागा असल्यास, भाडे करारपत्र व ना- हरकत

१०. बांधकाम असल्यास – प्लान अंदाजपत्र

११. उद्योजकाचे छायाचित्र, आधार, रेशनकार्ड

१२. प्रकल्प रु १ लाखापेक्षा अधिक असल्यास प्रकल्प अहवाल

२. सुधारित बीज भांडवल योजना:

वित्तीय संस्थांचे अर्थसहाय्य मिळवण्यासाठी लागणारे बीज भांडवल उभे करण्यास मदत

पात्रता:

१. कमीत कमी ७ वि पास

२. १८-५० वर्षे

३. किमान १५ वर्षे महाराष्ट्राचा रहिवासी

प्रकल्प मर्यादा:

रु. २५ लाख

बीज भांडवल – कमाल ३.७५ टक्के

बीज भांडवलाचे प्रमाण:

१० लाखापेक्षा कमी प्रकल्प खर्च असलेल्या प्रकल्पांसाठी:

   अ) सर्वसाधारणलाभधारक : १५%

   ब)  अनुसूचित जाती जमाती, अपंग ,विमुक्त भटक्या जाती जमाती: २०%

व्याजदर: ६% प्रती वर्ष.

परतफेड: ७ वर्षे.

विहित कालावधीत भरणा करणार्यांना: व्याजात ३% रिबेट

वाहन व्यवसाय, व्यापार आणि उद्योगांसाठी लागू.

३. जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना

(कर्ज रूपाने मार्जिन मनी योजना)

लागू: १. १ लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेली गावे व ग्रामीणक्षेत्रे

         २.  कारखाना व यांत्र्सामुग्रीमध्ये गुतंवणूक रु. २ लाखापेक्षा  अधिक नाही.

प्रकल्पाच्या २०% व जास्तीत जास्त रु. ४०,०००/-

अनुसूचित जाती व जमाती: प्रकल्पाच्या ३०% व जास्तीज जास्त रु. ३०,०००/-

व्याजदर: ४% प्रती वर्ष

परतफेड: ८ वर्षात

केवळ उत्पादन करू इच्छिणाऱ्या व्यवसायांना- व्यापार व सेवा व्यवसायास नाही.

उद्योग लघु उद्योग म्हणून नोंदणीस पात्र असावा. वयाची  नाही.

विनातारण १ कोटी कर्ज योजना

लघु आणि मध्यम उद्योगांना विनासायास कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यासाठी तारण ठेवण्याची आवश्यकता संपवण्यासाठी अतिशय सुंदर योजना शासनाने आणली.

दुर्दैवाने,  लोकांपर्यंत त्याची योग्य माहिती न पोहोचवल्याने आणि बॅंकांनीही निरुत्साह दाखवल्याने  हि योजना अधिक प्रभावीपणे राबवता आली नाही.

कुठल्याही सरकारी, शेड्युल्ड आणि खासगी बंकांमध्ये हि योजना उपलब्ध आहे.

नव्याने उद्योग सुरु करू इच्छिणारे कर्जासाठी अर्ज करू शकतात. यामध्ये कुठलेही तारण (कोलेटरल) ठेवले जात नाही. प्रायमरी (कर्जातून जी असेट उद्योजक खरेदी करेल) तारण ठेवले जाते.             
   

वांगे पिकासाठी खते, सुक्ष्म अन्नद्रवे आणि संप्रेरके.

●वांगे पिकासाठी खते, सुक्ष्म अन्नद्रवे आणि संप्रेरके.●

वांगे पिकासाठी लागवडीपुर्वी पासुन काढणी पर्यंत
जी आवश्यक खते आहेत ती वेळोवेळी दिल्यास भरघोस
उत्पादन आणि दर्जेदार फळे मिळतात. पुर्वमशागत करताना एकरी 10 टन शेणखत देऊन वखर पाळ्या
द्याव्या.
रेज्ड बेड पाडुन बेडवर रोप लागवड करण्यापुर्वी
बेसल डोस म्हणुन एकरी 50 किलो युरीया,  125 किलो सिंगल सुपर फाँस्फेट आणि 35 किलो म्युरेट आँफ पोट्याश द्यावे. उत्तम होण्यासाठी 20 व 45 दिवसांनी एकरी 25 किलो कँल्शियम नायट्रेट ठिबक मधुन द्यावे, किंवा 50 किलो युरीया द्यावा. याशिवाय रोप लागवडीनंतर 20/25 दिवसांनी 19:19:19 प्रती लिटर  पाण्यात 5 ग्रँम मिसळुन फवारावे।
तसेच फुलोरा सुरु होण्यापुर्वी 19:19:19 फवारावे आणि त्यानंतर 10/15 दगवसांनी 00:52:34 प्रती लिटर 5 ग्रँम आणि सुक्ष्म अन्नद्रव्ये ग्रेड - 2 प्रती लिटर पाण्यात 3 ग्रँम मिसळुन फवारावे. फळ धारणा होताना 00:52:45 प्रती लिटर पाण्यात 5 ग्रँम आणि बोराँन एक ग्रँम फवारावे. फळे पोसण्याच्या काळात प्रत्येक तोडणीनंतर 13:00:45 प्रती लिटर पाण्यात 5 ग्रँम आणि बोराँन 20 टक्के एक ग्रँम मिसळुन फवारावे. झाडाच्या खालची पाने हिरवीगार आणि वरची पाने पांढरट दिसत असतील तर चिलेटेड आर्यन प्रती लिटर पाण्यात एक ग्रँम मिसळुन फवारावे. फळांचा दर्जा, चकाकी यासाठी ट्रायकोटनल हे संप्रेरक 500 पीपीएम 200 लिटर पाण्यात 100 मिली मिसळुन 15 दिवसांच्या अंतराने तीन वेळा फवारावे.
विशाल खांडेकर
9049033844.

Monday, 9 July 2018

मेथी लागवड.

● मेथी लागवड ●

मेथीमध्ये असलेल्या विविध गुणधर्मांमुळे
मेथीला शहरी भागात चांगली मागणी आहे.
हे पाहता शहरालगतच्या भागात मेथीची
लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.
मेथीची पाने आणि देठ भाजीसाठी तर
बियांचा वापर मसाल्यामध्ये आणि लोणच्यात जास्त
प्रमाणात केला जातो. मेथीमध्ये अ, ब आणि क जीवनसत्वे तसेच प्रथिने, मँग्नेशियम, फाँस्फरस, पोटँशियम,लोह पुरेशा प्रमाणात असतात. मेथीमध्ये
विविध औषधी गुणधर्म आहेत. मेथी ही पाचक असुन यक्रुत व प्लिहा यांची कार्यक्षमता वाढविते. त्यामुळे पचनक्रियेची
कार्यक्षमता वाढते.
● हवामान:-
मेथी हेथंड हवामानातले पीक असले तरी उष्ण
हवामानातही चांगले येते. विशेषत: कस्तुरी मेथीचे पीक खरीप आणि रब्बी
अशा दोन्ही हगांमात घेता येतो.
● जमीन:-
गाळाच्या जमिनीत मथी उत्तम प्रकारे येते.
मध्यम ते कसदार, पाण्याचा उत्तम निचरा होणारी व जमिनीचा सामु 6 ते 7 च्या दरम्यान असलेली जमीन मेथीला जास्त मानवते.
● सुधारीत जाती:-
1.कस्तुरी
2.पुसा अर्ली बंचिंग
3.आर.एम.टी 1
4.मेथी नं. 47
● लागवड:-
लागवडीसाठी 3×2 मीटर आकाराचे सपाट वाफे करुन
बी फेकुन किवां 20 ते 25 सेंटी अंतरावर आळीतुन पेरावे. हेक्टरी 35 ते 40 किलो बी लागते.
● खत व्यवस्तापन:-
हेक्टरी 10 ते 12 बैलगाड्या शेणखत, 40 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश द्यावा. लागवडीनंतर 40 किलो नत्र प्रतीहेक्टर द्यावे.
पेरण्याच्या वेळी 10 किलो
बियाण्यास 250 ग्रँम रायबियम चोळल्यास उत्पादनात वाढ होते.
●पाणी नियोजन:-
पावसाळ्यात गरजेप्रमाणे पाणी
द्यावे. पाणी साचुन राहणार नाही याची काळजी घ्यावी. हिवाळ्यात
8 ते 10 दिवसांनी पाणी द्यावे.
● आतंरमशागत:-
आवश्यकतेनुसार पिकातील तण काढुन शेत तण मुक्त ठेवावे.
मेथी 1 टक्के युरीयाची फवारणी केल्यास पिकाची वाढ चांगली होते.
● काढणी:-
बी पेरल्यानंतर 30-40 दिवसात मेथी काढतात. किवां जमिनीलगत कापुन काढता येते. कंपनीमुळे खोडवा घेता येतो. कस्तुरी मेथीचे जास्त खोडवे घेता येतात. पुर्ण वाढलेली कोवळी मेथी काढावी. काढणीस उशीर झाँ्यास पाने कडवट होतात. भाजीच्या जुड्या बांधुन विक्रीस पाठवाव्यात.
● उत्पादन:-
देशी मेथीचे उत्पादन दर  हेक्टरी 10 ते 12 टन
मिळते, कस्तुरी मेथीचे 6 ते 7 क्किंटल बियाणे मिळते.
विशाल खांडेकर
9049033844

Sunday, 8 July 2018

श्रावण घेवडा लागवड.

●श्रावण घेवडा लागवड●

भारतात घेवड्याची लागवड सर्वत्र केली जाते.
महाराष्ट्रात पुणे ,सातारा,अहमदनगर,सोलापुर,नाशिक इत्यादी जिल्ह्यांमधेश्रावण घेवड्याची लागवड मोठ्या
प्रमाणात केली जाते.शेंगवर्गीय भाजीपाला पिकापैकी घेवडा हे कमी दिवसात अधिक उत्पन्न देणारे पीक
आहे. घेवड्याच्या कोवळ्या शेंगाची भाजी तसेच
सुकलेल्या दाण्यांची उसळ लोकप्रिय आहे. घेवड्यांच्या
पानाचा उपयोग जनावरांच्या चाऱ्यासाठी करता येतो.
शेंगामध्ये अ आणि ब जीवनसत्व तसेच खनिजे, लोह
 आणि चुना तसेच प्रथीने भरपुर प्रमाणात असतात.
● जमीन व हवामान:-
घेवडा हेक्टरी पीक हलक्या ते मध्यम जमिनीत
पाण्याचा निचरा असणाऱ्या जमिनीत उत्तम प्रकारे येते.
अतिभारी जमिनीत झाडांची वाढ भरपुर होते. परंतु
शेंगा कमी लागतात.
जमिनीचा सामु 5.5 ते 6 च्या दरम्यान असावा.
घेवडा हेक्टरी थंड हवामानात आणि पावसाळ्यात
येणारे पीक असुन 15 ते 40 अंस सेल्सिअस तापमानात
हेक्टरी पीक चांगले येते.
अतिथंडी व अतिउष्ण हवामान या पिकास मानवत नाही.
● पुर्व मशागत:-
जमिनीचा उभी आडवी नांगरट करुन, कुळवाच्या
पाळ्या देऊन ढेकळे फोडुन जमीन भुसभुशीत करावी.
जमिनीत 40 ते 45 बैलगाड्या हेक्टरी या प्रमाणात
शेणखत मिसळावे.
● लागवड हंगाम:-
महाराष्ट्रात या पिकाची लागवड तीनही हंगामात होते.
   खरीप हंगामासाठी जुन, जुलै महिन्यात,
रब्बी हंगामातसाठी सप्टेंबर आक्टोंबर महिन्यात आणि उन्हाळी हंगामात जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात घेवड्याची लागवड करतात.
● वाण:-घेवड्याच्या कटेंडर, पुसा पार्वती, अर्का कोमल, व्ही.एल, 5 जंपा, पंत अनुपमा, फुले सुयश या प्रकारच्या जाती लागवडी योग्य आहेत.
● बियाण्याचे प्रमाण:-
प्रति हेक्टरी 40 किलो बियाणे लागते.
टोकन पध्दतीने लागवड केल्यास हेक्टरी 25 ते 30 किलो बी लागते.
विशाल खांडेकर
9049033844.

Thursday, 5 July 2018

मॉल्बडेनियम चे पिकातील कार्य .

[७/६, ६:४६ म.पू.] 🌴Agriinfo🌴: *मॉलिब्डेनियम*
मॉल्बडेनियम चे पिकातील कार्य –
मॉल्बडेनियम पिकामध्ये नायट्रेटसचे रुपांतर अमिनो असिड मध्ये होण्यात कार्य करते.
सहजीवी नत्र स्थिरीकरणामध्ये गरजचे आहे.
मॉल्बडेनियम च्या उपलब्धतेवर परिणाम करणारे घटक –
जामिनीचा सामु – मॉल्बडेनियम हे एकमेव सुक्ष्मअन्नद्रव्य आहे जे की, जास्त सामु असलेल्या मातीत सहज उपलब्ध होते.
जास्त प्रमाणात पाणी वाहुन जाणा-या जमिनीत मॉल्बडेनियम ची कमतरता जाणवते.
मॉल्बडेनियम चे विविध स्रोत –

प्रकार मॉल्बडेनियम चे प्रमाण
सोडीयम मॉलिब्डेट 39%
मॉल्बडेनियम ट्राऑक्साईड 66%
अमोनियम मॉलिब्डेट
[७/६, ६:४६ म.पू.] 🌴Agriinfo🌴: सुक्ष्म अन्नद्रव्ये
पिकाच्या परिपुर्ण वाढीसाठी ५० पीपीएम पेक्षा कमी प्रमाणात लागणा-या अन्नद्रव्यांना सुक्ष्म अन्नद्रव्ये म्हणुन ओळखले जाते. या ठीकाणी या अन्नद्रव्य कमतरता ओळखण्यासाठी प्रातिनिधिक स्वरुपात छायाचित्रे देत आहोत.

झिंक
फेरस (लोह)
बोरॉन
मँगनीज
कॉपर
मॉलेब्डेनियम

फेरस (लोह) चे पिकातील कार्य.

*फेरस (लोह)*
फेरस (लोह) चे पिकातील कार्य –
हरीत लवक निर्मितीत आणि हरीतलवकाच्या कार्यात गरजेचे
पिकातंर्गत उर्जेच्या वहनासाठी गरजेचे
काही एन्झाईम्स व प्रोटीन्सचा घटक आहे.
पिकातंर्गत अन्ननिर्मितीसाठी आणि चयापचयाच्या क्रियेत गरजेचे आहे.
सहजीवी नत्र स्थिरीकरणाच्या क्रियेत गरजे आहे.
फेरस (लोह) उपलब्धतेवर परिणाम करणारे घटक –
जमिनीचा सामु – जास्त सामु असलेल्या जमिनीतील कार्बोनेटस् मुळे देखिल फेरसची उपलब्धता कमी होते.
फेरस स्फुरद संबंध – जास्त प्रमाणातील स्फुरदमुळे फेरसची उपलब्धता कमी होते.
नायट्रेट नत्राच्या वापारामुळे पिकातील धन-ऋण भार (अनायन-कॅटायन) असंतुलन निर्माण होवुन फेरसची उपलब्धता कमी होते.
फेरस मँगनीज संबंध – दोन्ही मुलद्रव्य विरोधात असल्याने एकाची जास्त उपलब्धता दुस-याची उपलब्धता कमी करते.
फेरस मॉल्बडेनियम – जास्त प्रमाणातील मॉल्बडेनियम मुळे पिकाच्या मुळांवर आयर्न मॉल्बडेट चा थर तयार होतो.
फेरसचे विविध स्रोत

प्रकार फेरसचे प्रमाण
फेरस सल्फेट 20%
फेरस अमोनियम सल्फेट 14%
आयर्न डीटीपीए चिलेट 10%
आयर्न एचईडीटीए चिलेट 5-12%

झिंकचे (जस्त) पिकामधिल कार्य .

*झिंक (जस्त)
झिंकचे पिका मधिल कार्य -
*
.
ऑक्झिन्स च्या निर्मितीमध्ये गरजेचे अन्नद्रव्य. प्रामुख्याने इंडॉल असेटिक असिडच्या निर्मितीत सहकार्य करते, ज्यामुळे पिकाची शेंड्याची वा जोमदार होण्यात मदत मिळते.
प्रथिनांच्या निर्मितीसाठी गरजेच्या एन्झाईम्सची निर्मिती करते. तसेच पिकामधिल शर्करेच्या वापरासाठी गरजेचे आहे.
झिंक पिकामध्ये स्टार्च तयार करणे आणि मुळांच्या वाढीसाठी गरजेचे आहे.
झिंक बिज (सीड) आणि खोडाच्या पक्वतेवर परिणाम करते.
झिंक हरीतलवक आणि कर्बोदकांच्या निर्मितीत गरजेचे आहे.
पिकाच्या पेशीमधिल योग्य प्रमाणातील झिंक च्या उपस्थितीमुळे पिक कमी तापमानात देखिल तग धरुन राहते.
झिंकच्या उपल्धतेवर परिणाम करणारे घटक-
.
जमिनीचा सामु- मातीचा सामु जास्त असल्यास झिकची कमतरता जाणवते. मात्र हा नियम सर्वच ठिकाणी लागु होत नाही, असिडीक स्वरुपातील झिंकचा वापर करुन हि कमतरता दुर करता येते.
झिंक आणि स्फुरद (फॉस्फोरस) चे गुणोत्तर - जास्त प्रमाणातील स्फुरद मुळे झिंक ची कमतरता जाणवते.
नत्राची कमी प्रमाणातील उपल्बधता पिकाच्या वाढीवर करित असलेल्या दुष्परिणांमुळे ईतर अन्नद्रव्यांचे शोषण कमी होते, हाच परिणाम झिंक वर देखिल लागु पडतो.
सेंद्रीय पदार्थ - जमिनीतील सेंद्रीय पदार्थ झिंक चा पुरवठा करीत असतात.तसेच जमिनीतील सेंद्रिय पदार्थांमुळे इनऑरगॅनिक स्वरुपातील जस्ताचे चिलेशन होवुन त्याची पिकास उपल्बधता वाढते.
जमिनीतील जास्त प्रमाणातील पाण्यामुळे झिंकची उपल्बधता कमी होते.
झिंक व कॉपर चे गुणोत्तर - पिक झिंक व कॉपर एकाच पध्दतीने शोषुन घेत असल्या कारणाने जर एकाचे प्रमाण वाढले तर दुस-याची कमतरता जाणवते.
झिंक व मॅग्नेशियमचे गुणोत्तर - मॅग्नेशियमच्या वापराने झिंक चे पिकाद्वारा शोषण वाढते.
जस्त (झिंक) ZN चे विविध स्त्रोत
जस्त (झिंक) Zn चे विविध स्त्रोत
उत्पादन रासायनिक फॉर्म्युला सर्वसाधारण झिंकचे प्रमाण
झिंक सल्फेट ZnSO4-H2O 36%
झिंक ऑक्झि सल्फेट Zn0-Zn SO4 38-50%
झिंक ऑक्साईड ZnO 50-80%
झिंक क्लोराईड ZnCl2 50%
झिंक (इ.डी.टी.ए.) चिलेट ZnEDTA 6-14%
झिंक ( एच.ई.डी.टी.ए.) चिलेट ZnHEDTA

मँगनीज चे पिकातील कार्य.

*मँगनीज*
मँगनीज चे पिकातील कार्य –
प्रकाश संश्लेषण क्रियेत कार्बन डाय ऑक्साईडचे रुपांतर शर्करेमध्ये होण्यात कार्य करते.
हरीत लवक निर्मितीत आणि नायट्रेट असिमिलेशन (वापर) मध्ये कार्य करते.
मँगनीज स्निग्ध पदार्थ (फॅटस्) तयार करण्याच्या प्रक्रियेत गरजेच्या एन्झाईम्स च्या अक्टिवेहशनसाठी गरजेचे आहे.
राबोफ्लॅविन, अस्कोर्बीक असिड, आणि कॅरोटीन तयार करण्यात गरजेचे आहे.
प्रकाश संश्लेषण क्रियेत ईलेक्ट्रॉन ची देवाण घेवाण करण्यात गरजेचे आहे. तसेच पाण्याचे विघटन करण्यात गरजेचे आहे.
मँगनीज पिकास उपलब्ध होण्यावर परिणाम करणारे घटक –
जमिनीचा सामु – मातीचा जास्त सामु (पीएच) मँगनीजची उपलब्धता कमी करते, तर कमी सामु वाढवते.
सेंद्रिय पदार्थ – जास्त प्रमाणात सेंद्रिय पदार्थ असलेल्या जमिनीत मँगनीज त्या पदार्थांसोबत स्थिर होते व त्याची कमतरता जाणवते.
मँगनीज फेरस संबंध- जास्त प्रमाणातील फेरस (लोह) मँगनीजची उपलब्धता कमी करते.
मँगनीज सिलिकॉन संबंध – सिलिकॉनच्या वापराने मँगनीजची विषबाधा कमी करता येते.
नत्राच्या कमतरतेमुळे मँगनीजची उपलब्धता कमी होते.
मँगनीज चे विविध स्रोत –

प्रकार मँगनीजचे प्रमाण
मँगनीज सल्फेट 23-28%
मँगनीज ऑक्साईड 41-68%
चिलेटेड मँगनीज

कॉपरचे पिकातील कार्य.

*कॉपर*
कॉपरचे पिकातील कार्य –
कॉपर पिकामध्ये प्रकाश संश्लेषण क्रियेत आणि श्वसनाच्या क्रियेत उत्तेजक म्हणुन कार्य करते.
अमिनो असिडचे रुपांतर प्रोटीन्स (प्रथिने) मध्ये करणा-या काही एन्झाईम्स चा घटक आहे.
कॉपर कर्बोदके (कार्बोहायड्रेटस) आणि प्रथिनांच्या पचनात गरजेचे आहे.
पिकाच्या पेशीला ताकद आणि सुरक्षा प्रदान करणा-या लिग्निनच्या निर्मितीसाठी कॉपर अत्यंत गरजेचे आहे.
कॉपर फळांच्या टीकाऊ क्षमतेवर, चव आणि शर्करेच्या प्रमाणावर देखिल नियंत्रण करते.
पिकावर कॉपर युक्त बुरशीनाशकांची सतत फवारणी होत असते त्यामुले देखिल कॉपर ची गरज भागुन निघते. याशिवाय विविध स्त्रोत खाली देत आहोत.
प्रकार कॉपरचे प्रमाण
कॉपर सल्फेट मोनो हायड्रेट 35%
कॉपर सल्फेट पेंटाहायड्रेट 25%
क्युप्रिक ऑक्साईड 75%
कॉपर क्लोराईड 17%
कॉपर चिलेटस्

बोरॉन

*बोरॉन*
बोरॉन पिकास शर्करा आणि स्टार्च यांत संतुलन साधते.
पिकातील शर्केरेच्या आणि कर्बोदकांच्या वहनात गरजेचे आहे.
परगीभवन आणि बीज (सीड प्रोडक्शन) निर्मितीत गरजेचे आहे.
नियमित पेशी विभाजन, नत्राच्या चयापचयात आणि प्रथिनांच्या चयापचयात गरजेचे आहे.
नियमित पेशी भित्तिका तयार होण्यात गरजेचे आहे.
पिकांतर्गत जल व्यवस्थापनात गरजेचे आहे.
बोरॉनच्या उपलब्धतेवर परिणाम करणारे घटक –
सामु – जास्त सामु बोरॉन ची कमतरता निर्माण करते.
जास्त प्रमाणात जमिनीत पाणी झाल्यास बोरॉन वाहुन जाते व बोरॉन ची कमतरता जाणवते.
बोरॉनचे विविध स्रोत –
प्रकार बोरॉन चे प्रमाण
बोरॅक्स 11%
बोरीक असिड 17%
सोडीयम टेट्राबोरेट 10-20%
सोल्युबोर

खोडवा ऊस पीकासाठी नियोजन.



      *खोडवा ऊस पीकासाठी नियोजन. *
🔴
1. पाचट कुटटी करुन गाढावी.
🔴
2. रोटर मारुन नांगरट करावी. शक्य असल्यास उभी आडवी नांगरट करावी.
🔴
3. सेंद्रीय खतांचा मुबलक वापर करावा.
🔴
4. ढेकळे फोडुन बारीक करुन घेऊन सरी काढावी.
🔴
5. सरी मध्ये थोडेसे सेंद्रीय खत पसरुन घ्यावे.

🔴
6. सेंद्रीय खतावर रासा खते - बेसल डोस टाकुन हलक्याश्या अवजाराने सरीतल्या मातीत मिसळुन घ्यावे. *मातीत मिसळुन घेणे अत्यंत महत्वाचे आहे.*

🔴
*लागणीचे वेळी*
7. बियाण्यावर बुरशीनाशक व किटक नाशकाची प्रक्रीया करुनच लागण करावी.
🔴
8. लागण करणे पुर्वी सरीत पाणी देऊन जमीन ओलावुन घ्यावी. कोरड्यात लागण करुन लगेचच पाणी द्यावे. किंवा पाण्यात लागण करावी.
🔴
9. लागणीनंतर सहा सात दिवसात हलकेसे पाणी द्यावे.
🔴
*सरीची रुंदी*
10. मध्यम व हलक्या जमीनीत साडेचार फुटी व मध्यम व खोल काळ्या जमीनीत पाच फुट रुंदीची सरी काढावी.

🔴
*बियाणातील अंतर*
11. मध्यम व हलक्या जमीनीत एक डोळा दीड फुटावर  व मध्यम व खोल काळ्या जमीनीत एक डोळा सव्वा फुटावर सरीत आडवे लावावे.

🔴
*तण नाशक*
12 . लागणी नंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी जमीनीत ओल असताना मेट्रीब्युझिन ची फवारणी एकरी 300 ते 400 ग्रॅम 150 लिटर पाण्यातून समान फवारावे.

🔴
*बेसल डोस*
13. अ. डी ए पी       100 किलो
       ब.  पोटॅश           75 किलो
       क. सु अ द्रव्ये      15 किलो
       ड. गंधक             15 किलो
       ई. मॅग्ने सल्फेट     25 किलो
       फ. किटक नाशक 10 किलो
🔴
*जिवाणु लागणी पासुन 10 व्या दिवशी*
14. अ. नत्र स्थिर करणारे   1 लिटर
       ब. स्फुरद विरघळणारे  1 लिटर
       क. ट्रायको                 1 लिटर
🔴
*डोस क्रमांक 2 लागणी पासुन 20/25 दिवसानी*
15. अ. युरीया           45 किलो
       ब.  लिंबोळी पेंड 10 किलो
             सरीत टाकावे.
🔴
*डोस क्रमांक 3 लागणी पासुन 40/45 दिवसानी*
16. अ. युरीया           90 किलो
       ब.  लिंबोळी पेंड 20 किलो
             सरीत टाकावे.
🔴
*फवारणी क्रमांक 1 लागणी पासुन 45 व्या दिवशी*
17. *पहिली फवारणी*  (  60 लिटर पाणी पुरते )
या फवारणित संजिवके आणि पोषण द्रव्ये सोबत बुरशी नाशक आणि कीटक नाशक आहे. याच दरम्यान *"खोड किड"* येत असते, काही बुरशी त्रास देत असतात, याचा विचार करुन ही फवारणी ठरवली आहे.

15 लिटरच्या  पंपाने फवारणी .
# पोषण द्रव्ये #
   *18:18:18 किंवा 19:19:19 - 600 ग्राम प्रती पंप 150 ग्रॅम
* चिलेटेड सुक्ष्म अन्न द्रव्ये- 80ग्रॅम  प्रती पंप 20 ग्रॅम

 # पीक संरक्षके #
* क्लोरोपायारिफोस            - 120 मिली प्रती पंप 30 मिली
* बाविस्टिन                         - 120 ग्राम   प्रती पंप 30 ग्रॅम

 # संजिवाके #
    * IBA                          - 1 ग्रॅम
    * 6 BA                        - 4 ग्राम
IBA  20-30 मिली अल्कोहोल (देशी दारु चालते) मध्ये आणि 6BA सालव्हन्ट मध्ये विरघळुन घ्यावे आणि 8 लीटर पाण्यात मिसळावे.
15 लिटरच्या पम्पात,  वरील तयार केलेल्या मिश्रणा पैकी 2 लिटर मिश्रण घ्यावे व  उर्वरीत निविष्ठा मिसळुन पाणी भरुन फवारणी घ्यावी.
*एकरी 15 लिटरचे 4 पम्प पुरतात*.

🔴
*डोस क्रमांक 4 लागणी पासुन 60/65 दिवसानी*
18. अ. युरीया           45 किलो
       ब. 242400     100 किलो
       क. पोटॅश            50 किलो
       ब.  लिंबोळी पेंड 10 किलो
             *मिसळुन पहारीने एकाच बगलेत 4 ते  6 इंच खोलीवर विभागुन आणि दोन छिद्रात एक फुट अंतराने खते घालावित.*

🔴
*फवारणी क्रमांक 2 लागणी पासुन 65 व्या दिवशी*
19.    *दूसरी फवारणी* ( 90 लिटर  पाणी पुरते )
या फवारणित संजिवके आणि पोषण द्रव्ये सोबत बुरशी नाशक आणि कीटक नाशक आहे. याच दरम्यान "खोड किड" असते, काही बुरशी त्रास देत असतात, याचा विचार करुन ही फवारणी ठरवली आहे.

# पोषण द्रव्ये #
   *12:61:0 किंवा 17:44:0     - 900 ग्राम. प्रती पंप 150 ग्रॅम
   * सी विड एक्स्ट्रॅक्ट- 120 ग्रॅम.  प्रती पंप 20 ग्रॅम

# पीक संरक्षके #
   * क्लोरोपायारिफोस/ रोगोर- 180 मिली. प्रती पंप 30 मिली
   * बाविस्टिन/कार्बेंडिझम       - 180 ग्राम.   प्रती पंप 30 ग्रॅम

# संजिवाके #
    * GA                         - 4 ग्राम
    * 6 BA                      - 4 ग्राम
GA अल्कोहोल मध्ये व 6BA सालव्हन्ट मध्ये विरघळुन घ्यावे आणि 12 लीटर पाण्यात मिसळावे.
15 लिटरच्या पम्पात,  वरील तयार केलेल्या मिश्रणा पैकी 2 लिटर मिश्रण घ्यावे व  उर्वरीत वरील निविष्ठा मिसळुन पाणी भरुन फवारणी घ्यावी.
*एकरी 15 लिटरचे 6 पम्प पुरातात*.

🔴
*फवारणी क्रमांक 3 लागणी पासुन 85 व्या दिवशी*
20.  *तीसरी फवारणी*  ( 135 लिटर पाणी पुरते )

# पोषण द्रव्ये #
   *12:61:0 किंवा17:44: 0      - 1350 ग्रॅम  प्रती पंप 150 ग्रॅम
   * सी विड एक्स्ट्रॅक्ट 180 ग्रॅम  प्रती पंप 20 ग्रॅम
   * पोटॅशियम शोनाइट 1 किलो  प्रती पंप 110 ग्रॅम

# पीक संरक्षके #
  * मोनोक्रोटोफॉस(आवश्यकतेनुसार)-270 मिली प्रती पंप 30 मिली
  * हेक्झकोनेझॉल(आवश्यकतेनुसार)- 270 ग्रॅम प्रती पंप 30  ग्रॅम
     # संजिवाके #
    *  GA                          - 6 ग्राम
    * 6 BA                        - 6 ग्राम
      GA अल्कोहोल मध्ये व 6BA सालव्हन्ट मध्ये विरघळुन घावे आणि 18 लिटर पाण्यात मिसळावे.
15 लिटरच्या पम्पात,  वरील तयार केलेल्या मिश्रणा पैकी 2 लिटर मिश्रण घ्यावे व  पाणी भरुन फवारणी घ्यावी.
*एकरी 15 लिटरचे  9 पम्प पुरातात*.
🔴
*डोस क्रमांक 5 लागणी पासुन 90 ते 120दिवसानी*
21. अ. युरीया            135 किलो
       ब. 242400       100 किलो
       क. सिं सु फॉस्फेट 150 किलो
       ड. पोटॅश             100 किलो
       ई.  लिंबोळी पेंड   100 किलो
       उ. सु अ द्रव्ये       15 किलो
       ए. गंधक             15 किलो
       ऐ. मॅग्ने सल्फेट    25 किलो
सरीत टाकुन भरणी पुर्ण करावी.

🔴
*जिवाणु भरणी  पासुन 10 व्या दिवशी*
22. अ. नत्र स्थिर करणारे   1 लिटर
       ब. स्फुरद विरघळणारे  1 लिटर
       क. ट्रायको                 1 लिटर

🔴
फवारणी क्रमांक 4 लागणी पासुन 105 व्या दिवशी*
23.  *चौथी फवारणी*  ( 150 लिटर पाणी पुरते )

*ही फवारणी महत्वाची आहे, या नंतरची फवारणी ऊसाच्या ऊंची मुळे करता येण्याची  शक्यता कमी असते.*

# पोषण द्रव्ये #
  *13:0:45  - 1000 ग्राम,   प्रती पंप 100 ग्रॅम
  * पोट्याशियम माग्नेशियम सल्फेट - 1kg प्रती,  पंप 100 ग्रॅम
    * ट्रायकाँन्टेनाँल  0.1 %       - 500 मिली प्रती पंप 50 मिली
    * सी विड एक्स्ट्राक्ट            - 200 ग्रॅम  प्रती पंप 20 ग्रॅम

   * क्विनॉलफॉस                   - 400 मिली प्रती पंप 40 मिली
   * कार्बेंडॅझीम                       - 400 ग्रॅम  प्रती पंप 40 ग्रॅम

  # संजिवाके #
    *  GA                          - 7 ग्राम
    * 6 BA                        - 7 ग्राम
       GA अल्कोहोल मध्ये व 6BA सालव्हन्ट मध्ये विरघळुन घावे आणि 20 लीटर पाण्यात मिसळावे.
15 लिटरच्या पम्पात,  वरील तयार केलेल्या मिश्रणा पैकी 2 लिटर मिश्रण घ्यावे व  पाणी भरुन फवारणी घ्यावी.
*एकरी 15 लिटरचे 10 पम्प पुरातात*.

🔴
*डोस क्रमांक 6 भरणी पासुन 30 दिवसानी*
24. अ. अमो सल्फेट   45 किलो
       ब. 242400     100 किलो
       क. पोटॅश            25 किलो
       ब.  लिंबोळी पेंड 10 किलो
             *मिसळुन सरीत टाकावे.

🔴
फवारणी क्रमांक 5 लागणी पासुन 125 व्या दिवशी*
25. *पाचवी फवारणी (शक्य झालेस)*
         ( 180 लिटर पाणी पुरते )

# पोषण द्रव्ये #
  *12:61:0                           - 1350 ग्राम प्रती पंप 100 ग्रॅम
  * माग्ने सल्फेट/ मॅग्ने नायट्रेट  - 750 ग्राम  प्रती पंप 60 ग्रॅम 
  * सी विड एक्स्ट्राक्ट              - 260 ग्रॅम   प्रती पंप 20 ग्रॅम 
 
  *क्लोरोपायरीफॉस                - 400 मिली प्रती पंप 30 मिली
  *हेक्झाकोनेझॉल                    - 400 मिली प्रती पंप 30 मिली
 # संजिवाके #
    *  GA                              - 10 ग्राम
    * SIX BA                        - 10 ग्राम
    GA  अल्कोहोल मध्ये व 6BA सालव्हन्ट मध्ये विरघळुन घावे आणि वरील 26 लीटर पाण्यात मिसळावे.
15 लिटरच्या पम्पात,  वरील तयार केलेल्या मिश्रणा पैकी 2 लिटर मिश्रण घ्यावे व उरलेले पाणी भरुन फवारणी घ्यावी.
*एकरी 15 लिटरचे 13 पम्प पुरातात*.           
                                   
🔴
*डोस क्रमांक 7 भरणी पासुन 60 दिवसानी*
26.  अ. ॲमो सल्फेट 50 किलो
        ब. पोटॅश           25 किलो

Liked on YouTube: ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ

ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ #Dboss, #Kumarswamy, #Mandyaelection. Darshan fan latest v...