●वांगे पिकासाठी खते, सुक्ष्म अन्नद्रवे आणि संप्रेरके.●
वांगे पिकासाठी लागवडीपुर्वी पासुन काढणी पर्यंत
जी आवश्यक खते आहेत ती वेळोवेळी दिल्यास भरघोस
उत्पादन आणि दर्जेदार फळे मिळतात. पुर्वमशागत करताना एकरी 10 टन शेणखत देऊन वखर पाळ्या
द्याव्या.
रेज्ड बेड पाडुन बेडवर रोप लागवड करण्यापुर्वी
बेसल डोस म्हणुन एकरी 50 किलो युरीया, 125 किलो सिंगल सुपर फाँस्फेट आणि 35 किलो म्युरेट आँफ पोट्याश द्यावे. उत्तम होण्यासाठी 20 व 45 दिवसांनी एकरी 25 किलो कँल्शियम नायट्रेट ठिबक मधुन द्यावे, किंवा 50 किलो युरीया द्यावा. याशिवाय रोप लागवडीनंतर 20/25 दिवसांनी 19:19:19 प्रती लिटर पाण्यात 5 ग्रँम मिसळुन फवारावे।
तसेच फुलोरा सुरु होण्यापुर्वी 19:19:19 फवारावे आणि त्यानंतर 10/15 दगवसांनी 00:52:34 प्रती लिटर 5 ग्रँम आणि सुक्ष्म अन्नद्रव्ये ग्रेड - 2 प्रती लिटर पाण्यात 3 ग्रँम मिसळुन फवारावे. फळ धारणा होताना 00:52:45 प्रती लिटर पाण्यात 5 ग्रँम आणि बोराँन एक ग्रँम फवारावे. फळे पोसण्याच्या काळात प्रत्येक तोडणीनंतर 13:00:45 प्रती लिटर पाण्यात 5 ग्रँम आणि बोराँन 20 टक्के एक ग्रँम मिसळुन फवारावे. झाडाच्या खालची पाने हिरवीगार आणि वरची पाने पांढरट दिसत असतील तर चिलेटेड आर्यन प्रती लिटर पाण्यात एक ग्रँम मिसळुन फवारावे. फळांचा दर्जा, चकाकी यासाठी ट्रायकोटनल हे संप्रेरक 500 पीपीएम 200 लिटर पाण्यात 100 मिली मिसळुन 15 दिवसांच्या अंतराने तीन वेळा फवारावे.
विशाल खांडेकर
9049033844.

No comments:
Post a Comment