Wednesday, 2 May 2018

महत्वाची तणनाशके.

🌴agriinfo🌴:
 महत्वाची तणनाशके

२, ४- डी : हे घोळ, चांदणी, काटेमाठ, वसंतवेल, दीपमाळ, तांदुळजा यांसारख्या रुंद पानांच्या द्विदल तणांचा नॅश करण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे ज्वारी, बाजरी, मका, गहू, ऊस यांसारख्या द्विदल किंवा रुंद पानांच्या पिकांना हानिकारक आहे. त्यांना यापासून नुकसान पोहोचते. हे तणनाशक तण उगविण्यापूर्वी किंवा उगवल्यानंतर असे दोन्ही वेळा मारता येते. हे तणनाशक सोडिअम क्षार व इस्टर या तीन संयुगांच्या स्वरूपात मिळते.

अॅट्राझीन : हे निवडक तणनाशक असून ज्वारी, बाजरी, मका, ऊस, द्राक्षे व इतर पिकांमधले वार्षिक रुंद पानाच्या गावात वर्गातील तणांचा नाश करते. तण उगवणीपूर्वी किंवा उगवणीनंतर फवारता येते.

बासालीन : हे निवडक तणनाशक असून वर्षायू गावात व रुंद पानांचे तण यासाठी उपयुक्त आहे. कापूस, भुईमूग, सोयाबीन, वाटाणा, टोमॅटो, बटाटे, हरभरा, तूर, वांगी इत्यादी पिकातील तणांचा नाश करते. याचा वापर मुख्य पीक पेरण्याआधी किंवा ते रुजण्यापूर्वी करावा. हेक्टरी १ ते २ लिटर वापरावे.
[5/3, 10:19 AM] 🌴agriinfo🌴: स्टॅम एफ-३४ (प्रोपानिल) : गवतवर्गीय तणे व रुंद पानांची तणेही निवडकपणे या तणनाशकाकडून नष्ट केली जातात. हे स्पर्शजन्य तणनाशक आहे. या तणनाशकामुळे दोन ते चार पानांच्या अवस्थेत असणारी तणे लवकर नष्ट होतात.

पॅरक्वॉट :  हे स्पर्शजन्य साधारण तणनाशक आहे. या तणनाशकाचा मुख्यत्वे गवतवर्गीय तणे नष्ट करण्यासाठी वापर होतो. तसेच द्राक्षे, मोसंबीवर्गीय पिके, चहा, कॉफी, रबर वैगरे गावातवर्गीय तणे व पाण्यात वाढणारी तणे नष्ट करण्यासाठीसुद्धा याचा उपयोग होतो.

डायक्वॉट : या स्पर्शजन्य साधारण तणनाशकाकडून सर्व प्रकारची तणे नष्ट होतात. मात्र द्विदलवर्गीय तणांसाठी हे विशेष प्रभावी असून पाण्यात वाढणाऱ्या ताणांसाठीही उपयुक्त आहे.

मॅचेट (ब्युटाक्लोर) : लावणी केलेल्या व पेरलेल्या भट पिकातील गवतवर्गीय तणे तसेच रुंद पानांच्या तणांचा बंदोबस्त मॅचेट वापरून चांगल्या प्रकारे करता येतो. दाणेदार स्वरूपातील तणनाशक तण उगविण्यापूर्वी तर द्रव स्वरूपात मिळणारे तणनाशक तणे उगविल्यानंतर फवारतात.

ग्लायफोसेट ४१ एस. एल. (ग्लायसिल/ राऊंड अप/ ग्लायफॉस) : हे अनिवडक तणनाशक असून लव्हाळा, हरळी किंवा रुंद पानांच्या ताणांचाही उत्तम प्रकारे नॅश करते. विशेषकरून हे पेरणीपूर्वी लव्हाळ्याचा नॅश करण्यासाठी वापरले जाते.

No comments:

Post a Comment

Liked on YouTube: ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ

ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ #Dboss, #Kumarswamy, #Mandyaelection. Darshan fan latest v...