Tuesday, 1 May 2018

तीघा बहीण भावानी सुरू केला कुक्कुटपालनाचा व्यवसाय.




भोकरदन- घराचा उंबरठा ओलांडून आज महिला जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अनेक आव्हानात्मक क्षेत्रांत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कर्तृत्व सिद्ध करीत आहेत. जिद्दीच्या जोडीला अहोरात्र मेहनत करायची तयारी असेल, तर कोणताही उद्योग महिलांसाठीही अवघड नाही. येथून जवळच असलेल्या विभी पोल्ट्री फार्मची अवघड परिस्थितीतून उभारणी करणाऱ्या दोन बहिणींच्या यशोगाथेतून हेच दिसून येते. या दोन्ही बहिणी मूळच्या नाशिकच्या असून, केवळ स्वतः काहीतरी वेगळे, आव्हानात्मक करावे या हेतूने त्यांनी या दुष्काळी प्रदेशाची निवड केली आहे. एक बहीण विवाहित असून, तिचे पती नाशिकच्या कंपनीत मोठ्या हुद्यावर आहेत.

भोकरदनपासून सहा किलोमीटरवर जालना रोडवर विभी पोल्ट्री फार्म नामक कुक्कुटपालन केंद्र आहे. वर्षभरापूर्वीच सुरू झालेल्या या केंद्राच्या माध्यमातून परिसरातील युवकांना रोजगार मिळाला आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे दोन सख्ख्या बहिणींनी लहान भावाच्या मदतीने हा उद्योग सुरू केला असून, या कुक्कुटपालन केंद्रातून दिवसाकाठी 35 हजार अंडी निघतात. सोनाली सुनील भंडारे (वय 36), गीतांजली भीमसेन जाधव (34) व गिरीश भीमसेन जाधव (वय 32) अशी या तिघा भावंडांची नावे आहेत.
नाशिकसारख्या मोठ्या शहरात गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून या तिघांनी शेती करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांना सर्वांचाच विरोध पत्करावा लागला. गिरीश जाधव मेकॅनिकल इंजिनिअर, तर सोनाली जाधव या सिव्हिल इंजिनिअर असल्याने हायटेक पद्धतीने शेती करावी, असा त्यांचा विचार असताना शेतीसोबत जोडधंदा असावा, अशी कल्पना गीतांजली यांनी मांडली. त्यांनी वेंकीज चिकनच्या माध्यमातून कुक्कुटपालनाच्या व्यवसायाची माहिती घेतली. सुरवातीला छोट्या तत्त्वावर हा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर त्यांनी बाजारपेठेचा सर्व्हे केला. त्यात मराठवाड्यात हैदराबाद व नाशिकहून अंडी येतात, अशी माहिती त्यांना मिळाली. अशा परिस्थितीत त्यांनी शहराजवळ बंद पडलेला पोल्ट्री फार्म विकत घेतला.
सत्तर हजार कोंबड्या
या पोल्ट्रीमध्ये पडक्या अवस्थेत चार शेड होत्या. साधारण आठ कोटींचे भांडवल त्यांनी बॅंक व काही स्वतः उपलब्ध करून कोंबड्यांची वीस हजार पिले आणून व्यवसाय सुरू केला. "महावितरण'कडे अनेकदा चकरा मारूनही अनेक दिवस विजेची व्यवस्था न झाल्याने दोन महिने प्रचंड हाल सोसावे लागल्याचे सौ. जाधव म्हणाल्या. विशेष म्हणजे या एवढ्या मोठ्या उद्योगासाठी त्यांनी कुठलेही अनुदान घेतलेले नाही. तिघे भावंडे पूर्णवेळ या व्यवसायात लक्ष देतात. आजमितीस येथे पाच शेड असून, एका शेडचे काम प्रगतिपथावर आहे, तसेच सत्तर हजार कोंबड्या या कुक्कुटपालन केंद्रात आहेत.
रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रयोग
पाण्याची सर्वांत मुख्य समस्या असल्याने त्यांनी अर्धा एकरात अत्याधुनिक शेततळे उभारले. दोन विहिरीदेखील घेतल्या. शिवाय रेन वॉटर हार्वेस्टिंग केले आहे. आज येथील किमान 35 पेक्षा जास्त युवकांना कुक्कुटपालनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाला आहे. सोयगावदेवी येथील श्रीरंग राऊत व अण्णा सहाणे या युवकांनी त्यांच्या सहकार्यातून शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन केंद्र सुरू केले आहे.
कोंबड्यांना शाकाहारी खाद्य
सर्व कोंबड्यांना ते मका, सोयाबीन अशा स्वरूपाचे शाकाहारी खाद्य देत असल्याने या परिसरात दुर्गंधी दिसून येत नाही, हे विशेष! दिवसाला दोन लाख अंडी उत्पादन करण्याची क्षमता असणारे अत्याधुनिक व इको-फ्रेंडली असे आदर्श कुक्कुटपालन केंद्र बनविण्याचा मानस असल्याचे गीतांजली जाधव यांनी "सकाळ'ला सांगितले. कृषी विभाग व "नाबार्ड'चे अधिकारी येऊन फक्त भेटी व आश्वासने देऊन जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. कुक्कुटपालनाच्या व्यवसायात चिकाटी असणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या

No comments:

Post a Comment

Liked on YouTube: ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ

ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ #Dboss, #Kumarswamy, #Mandyaelection. Darshan fan latest v...