Tuesday, 1 May 2018

क्षारयुक्त जमिनीची सुधारणा.

क्षारयुक्त जमिनीची सुधारणा.

पिकांची वाढ होण्यासाठी जमीन हे अतिशय महत्वाचे माध्यम आहे. जमीनीचे ४ प्रमुख घटक आहेत (१) माती (२) सींद्रिय पदार्थ (३) हवा (४) पाणी ; ज्या जमिनीत मातीचे प्रमाण ४५ टक्के , सेंद्रिय पदार्थ ५ टक्के, हवा आणि पाणी २५ टक्के असते, अशा जमिनीत पिकाची वाढ चांगली होते. जमिनीची घडण उत्तम राहण्यासाठी जमिनीची योग्य मशागत व सेंद्रिय पदार्थ भरपूर वापर व पिकाची फेरपालट करावी.

गुणधर्म:
या जमिनीत सोडियमचे प्रमाण १५ टक्के पेक्षा जास्त असते. विद्राव्य क्षाराची विद्युत वाहकता ४ डेसी सायमन प्रती मीटर कमी असते व सामू ८.५ ते १० पर्यंत असतो. जमिनीतून पाण्याचा निचरा होत नाही. वाळल्यावर जमीन टणक होते, ओल्यापणी अतिशय चिबड होते. अशा जमिनीत हवा खेळती राहत नाही व त्यामुळे पिकांची वाढ चांगली होत नाही.

१. जमिनीला १ टक्के उतार दयावा.
२. जमिनीखाली सच्छीद्र पाईप टाकून पाण्याचा भूमिगत निचरा करावा.
३. जमीन सपाट करून योग्य अंतरावर चर काढावे.
४. माती परीक्षण करून जिप्सम, गंधक, आयर्न पायरईट या सारखा भूसुधारकाचा वापर करावा. जमिन गरजेनुसार सर्वसाधरण ५ ते १० टन हेक्टरी जिप्सम शेणखत मिसळून टाकावे.
५. क्षाराचा निचरा केल्यानंतर अशा जमिनीत शुगरबीट, बारली, बरसीम, भात, गहू, ऊस, कापूस या सारखी क्षार सहनशील पिके घावीत.
६. सेंद्रिय खताचा वापर वाढवावा.
७. पिकाची फेरपालट करत असताना धैचा घ्यावा.
८. माती परीक्षण करून खते शिफारशीपेक्षा २५ टक्के वाढवून दावी.
◆चुनखडीयुक्त जमीन
गुणधर्म:
१. सामू ८ पेक्षा जास्त व घडण कठीण असते.
२. जमिनीची विद्युत वाहकता १ डेसी सायमन प्रती मीटर कमी असते.
३. भौतिक गुणधर्ममाध्ये घनता वाढते व जलधारण शक्ती कमी होती.
४. हवा व पाणी खेळण्याचे प्रमाण कमी होते.
५. नत्र, स्पुरद, पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी होते.
६. वाळवी, हुमणी व किडीचा उपद्रव वाढतो.
७. पिकाची वाढ खुंटते.
सुधारणा:
१. खोलवर नांगरट करावी.
२. हिरवळीच्या खतांचा भरपूर वापर करावा.
३. रासायनिक व चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्याचा अधिक वापर फवारणीने करावा.
४. सहनशील पिकांची निवड करावी. सीताफळ, बोर, आवळा, सुर्यफुल, सोयाबीन, गहू, कापूस ऊस इ.
●जमिनीचे व्यवस्थापन:
◆जमिनीचे सपाटीकरण
ज्या जमिनी उंच सखल आहेत किवां चढ उतारचा आहेत अशा जमिनिसाठी सपाटीकरण करणे आवशयक आहे. पाणी जमिनीवर साठून राहू नये याची काळजी घावी व पावसाचे पाणी ते उताराचे दिशेने चरीत सोडावे.
◆पाणी नियोजन
जमिनीची क्षारता कमी करण्यासाटी व क्षारपड जमिनीची सुधारणा झाल्यनंतर जमिनीत पाण्याची पातळी वाढू नये यासाठी अति पाण्याचा वापर कमी केला पाहेजे. ठिबक सिंचनाचा वापर केला पाहेजे. पाण्याची प्रत, क्षारांची प्रत, विद्रव्य क्षार २००० मिलीग्रॅम / लिटर किंवा ३.१२ डेसी सायमन प्रती मीटर पर्यंत असल्यास ते पाणी ठिबक सिंचनासाठी वापरता येते.
◆जमिनीची मशागत
जमिनीत खोलवर नांगरट केल्यमुळे जमिनीत हवा खेळती राहते व पाणी मुराण्याचे प्रमाण वाढते. वरीलभागावरचे क्षार खोलवर जाण्यास मदत होते. चोपण किंवा भारी जमिनीवर सबसॉयलर औजार वापरून खोलवर नांगरणी करता येते.
◆पिकाची फेरपालट
जमिनीची समस्या कमी करण्याचा दृष्टीने एकच पीक वारंवार न घेता थोडी फेरपालट करणे आवश्यक असते. कायम आडसाली ऊस लावण्यापेक्षा खरीप हंगामात सोयाबीन, भूईमुग यासारखी पिके शिवाय ताग, शेवरी या सारखी पिके हिरवळीची खते घेतल्यास समस्या कमी होऊ शकते.
◆माती परीक्षण
कोणत्याही जमिनीचे व्यवस्थापन करण्यापूर्वी त्या जमिनी कोणत्या प्रकारच्या आहेत याची तपासणी करावी व नंतर सुधारणाचे उपाय करावेत.
◆रासानिक खते
क्षार व चिबड जमिनीतून बऱ्याच प्रमाणात नत्राचा ह्यास होतो. त्यासाठी नत्र खताची मात्रा २५ टक्के जास्त देणे फयाद्याचे ठरते. त्याशिवाय स्फुरद, लोह, व जस्ताची कमतरता सुद्धा आढळते. त्या साठी सेंद्रिय खतासोबत रासायनिक खते वापरणे गरजेचे असते. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकवता येते.
◆कंपोस्ट कल्चरचा वापर
क्षारपड जमिनी सुधारण्यासाठी अनेक मार्गाचा अवलंब करावा लागतो. कंपोस्ट कल्चरचा वापर करून शेतातील पाचट, गव्हाचे काड, भाताचे पिंजर, काडीकचरा इ. टाकाऊ पदार्थपासून कंपोस्ट खत तयार करावे. या खताचा जमिनीत वापर केल्याने मातीची रचना बदलते आणि हवा + पाणी यांचे प्रमाण प्रमाणशीर होते व जादा पाणी निचरा होण्यास मदत होते.
जमीन क्षारयुक्त किवां चोपण होऊ नये म्हणून घावयाची काळजी:
१. जमीन सपाट असव्यात व बांधबंदिस्ती करावी.
२. जमिनी मध्ये पाणी साठवून राहणार नाही याची काळजी घ्यावी.
३. जमिनीतून पाण्याचा निचरा चांगला होण्यासाठी योग्य अंतरावर चर काढावेत.
४. जमिनीत पाण्याची पातळी २ मीटर च्या खाली ठेवावी.
५. पिंकाचा वाढीसाठी लागेल एवढेच पाणी द्यावे. विशेष करून उस पिकास खत व पाणी योग्य प्रमाणात दयावे.
६. आपल्या भागातून कालवा वहात असल्यास त्यामधून पाणी झिरपून देवू नये.
७. जमिनी मध्ये हिरवळीची खते वापरून मातीची घडण चांगली ठेवावी. त्यामुळे हवा खेळती राहते व जादा पाण्याचा निचरा होण्यासाठी मदत होते.
८. विहिरीचे पाणी जास्त खारवट असल्यास असे पाणी वापरू नये.
९. माती व पाणी नेहमी तपासून जमिनीतील बदल याबद्दल माहिती घावी.
१०. सूक्ष्म जलसिंचनाचा व तुषार सिंचनाचा वापर करावा.
११. क्षार व चोपण जमिनीसाठी क्षार प्रतिकारक पिकांची निवड करावी

No comments:

Post a Comment

Liked on YouTube: ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ

ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ #Dboss, #Kumarswamy, #Mandyaelection. Darshan fan latest v...