Wednesday, 9 May 2018

*लाटांपासुन सावधान*

व्यवसाय निवडताना लाटेत वहावत जाऊ नका, योग्य ते निवडा

ईमु पालन
ससे पालन
महागुनी वृक्ष
कोरफड लागवड
मशरूम
स्पिरुलिना
मोती
केशर
शेण गोमूत्राचीे औषधे


त्यात आता भर पडली आहे                                कडकनाथ कोंबडी , शेळी पालन

ही काही लाटेची ऊदाहरणे....
आणखीही आहेत,

पण ही ऊदाहरणे प्रत्येकाच्या लक्षात राहणारी आहेत
या व्यवसायांची एके काळी लाट आली होती.

दररोज कोणत्यातरी पेपरात बातमी, प्रशिक्षण केंद्रांचा सुळसुळाट, दर दोन चार दिवसांनी या व्यवसायांमुळे करोडपती झालेल्या एखाद्या ऊद्योजकाची माहीती....


त्यावेळी सोशल मिडीया प्रभीवी नव्हतं म्हणुन गावागावात पत्रके वाटली जात, कार्यशाळा आयोजीत केल्या जात..... अक्षरशः तरुणांना, नवऊद्योजकांना झपाटलं होतं या लाटांनी. ज्याला कुणाला व्यवसाय करायचा असेल तो आधी याच व्यवसायांच्या मागे लागत असे, जणु काय जगात या व्यवसायाव्यतिरीक्त व्यवसायंच नाही.

आज यांची काय परिस्थिती आहे? या लाटांमधे वहावत जाऊन ज्यांनी व्यवसाय सुरु केले त्यांची काय अवस्था आहे हे पाहिलंय का?

या लाटांवर भरवसा ठेऊन पैसे गुंतवलेले ९९.९९% नवऊद्योजक तोट्यात गेलेत.... यांचे व्यवसाय ठप्प झालेत... ज्यांनी आयुष्यभराची कमाई यात लावली ते आता कुठेतरी नोकरी करत आहेत....

प्रशिक्षण संस्थावाले, ईमु, ससे विकणारे, कोरफडीचं, महागुनीचं रोपटं, बी विकणारे लखपति करोडपति झाले आणि यांना पाळणारे, शेतीमधे लाखो गुंतवणारे भिकेला लागले.... कारण या लोकांनी विक्रीचं कोणतंही मार्गदर्शन केलंच नव्हतं... या लोकांच टार्गेट फक्त स्वतःचा माल विकणे एवढच होतं. सुरुवातीचे काही दिवस या लाटावर हिंदोळे घेत नवऊद्योजक पैशाच्या राशीत  खेळत होते, पण हळुहळु एकेकाचा प्रकल्प बंद पडत गेला आणि शेवटी सर्वच संपलं....

अशा लाटा आजही येत आहेत, यात बरेच जण अडकलेत, डुबलेत, पस्तावलेत, पण आपण सारासार विचार करायला तयार नाही... ऐकीव माहितीवर विश्वास ठेऊन कमी कष्टात अति ऊत्पन्नाच्या हव्यासापाई पैसे गुंतवुन या जाळ्यात स्वतःहुन अडकत आहोत....

आता आजच्या लाटा कोणत्या हे थोडा विचार केला तर तुम्हाला ऊत्तर सापडणे अवघड नाही, कारण या लोकांची मार्केटींग स्ट्रॅटेजी तीच आहे.... त्यात काडीचाही बदल झालेला नाही.... कारण कमी कष्टात पैसे कमावण्याचा हव्यास असणारे तेव्हाही होते आणि आत्ताही आहेत....

*लाटांमधे अडकु नका, सारासार विचार करा, तुमच्यासाठी काय योग्य आहे याचा स्वतः शोध बोध  घ्या आणि मगंच व्यवसाय निवडन्याचा निर्णय घ्या !*

No comments:

Post a Comment

Liked on YouTube: ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ

ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ #Dboss, #Kumarswamy, #Mandyaelection. Darshan fan latest v...