Saturday, 21 April 2018

जिवंत माती.

जिवंत माती.
    १ ग्रॅम जिवंत मातीत, कोट्यावधी जीवाणू असतात, हे सर्व जिवजंतू जन्म मृत्युच्या अनंतचक्रात अव्याहतपणे फिरत असतात.... जिवंत जमिनीत ह्या चक्रांची संख्या अनेक पटिने वाढते,,, अशी जमीन वनस्पती जीवनाला पोसण्यास संपूर्णतः सक्षम असते... भगवंताने लाखो वर्षांपर्यंत अविरत परिश्रमांती हि जीवंत माती तयार केली मात्र मनुष्याने रसायने वापरून तिची धूळदान चालवली आहे,,, शेती निसर्गाची आहे, हेच मुळी मानवाच्या लक्षात नाही..
   ' जमिनीवरून चालतांना पायांना जर एखादया जाड गादिवरून चालण्याचा अनुभव मिळाला, तर ती आपली काळी आई / जिवंत माती आहे, असे समजावे... ' खरी आईची कूस जपायची वेळ आली आहे,, नाहीतर कूसही नाही आणि ऊबही नाही मिळणार... निसर्ग अजूनही वेळ देत आहे,,, सावरण्यातच शहाणपण आहे... !थकलेल्या आपल्या लेकराने अंग टाकल्यानंतर त्याच्या शरीरातील ताणतणाव जी शोषून घेते, अशा चुंबकिय शक्तिने ओतप्रोत व मानवी शरीराला मातीने ( मायेचा हात ) व्याधीमुक्त करणाऱ्या मातीस जिवंत म्हणजे जीवजिवाणूंनी संपृक्त माती संबोधतात.. !
  नैसर्गिक जंगलातील जमिनीत २ ते ५ टन / हेक्टर कीटक असतात, ६.५ टन / हे. गांडूळे असतात व ०.५ टन / हेक्टर सूक्ष्म जीवाणू असतात.. जमिनीत हे जीवजीवाणू ३ प्रकाराने आपले वास्तव्य करतात. चांगल्या जमिनीत मातीच्या कणांची सुव्यवस्थित रचना तयार झालेली असते.. मातीच्या २ कणांभोवती पोकळी असते, प्रत्येक कणांभोवती पाण्याच्या रेणूंनी तयार केलेले १ पातळ जलवलय असते, ज्यातून केशमुळ्या अन्न, पाणी स्विकारतात,,, तसेच जमिनीत प्राण्यांनी तयार केलेली बिळे असतात.... सूक्ष्म जीवाणूंपैकी जे जलजीवन जगतात ( अल्प प्रमाण ) ते या कणाभोवतीच्या जलवलयात राहतात,, इतर जीवाणू ( जे हवेचा आधार घेतात ) २ मातीकणांच्या पोकळयांतील हवेत राहतात आणि ठळक जंतू, किडे, गांडूळासारखे प्राणी बिळे करुन राहतात.... !
   जिवजंतूंचे जमिनीतील अस्तित्व त्या जमिनीत असणारे जिवामृताचे ( ह्युमस), सेंद्रिय पदार्थांचे ओलावा व उष्णतेचे प्रमाण किती आहे, ह्यावर अवलंबून असते.. जमिनीतील जैवभार जेवढा जास्त असेल तेवढी त्याची वाढ मंद राहिल व हि वाढ त्या जमिनीतील असलेल्या सेंद्रिय पदार्थांपेक्षा ( पिकाचे मूळ व काड ) जमिनीतील असलेल्या जीवामृताच्या (हयुमसच्या ) उलाढालीवर अवलंबून असते...!
    जिवजंतू आपले अन्न मंदपणे उत्पादन करतात व आक्रमणकारी रोगाणूंचे आक्रमणाला प्रतिबंध करतात. पिकांच्या कापणीवेळी त्यांच्या मुळापासून अन्नपुरवठा वेगाने स्त्र वित होण्याचा काही निश्चित कालमान असतो आणि पिकांच्या वाढकाळात हि अन्नद्रव्ये पिकांच्या मूळांतून स्त्रवित झालेली असतात.. पिकांच्या मूळ्यांतून जमिनीत साखर किंवा अन्नमिश्रण मुक्त होण्याच्या प्रक्रियेत झाडांची ३०% ऊर्जा नष्ट होते, तरीही जमिनीतील जीवसृष्टी ते अन्न मिळवतात.. तथापि हि जीवसृष्टी अपुऱ्या अन्नपुरवठयावरही आपले अस्तित्व दाखविते... !
   विशेष भरपूर आहे मात्र आपण आपली आई विषमुक्त करून कशी जिवंत ठेवायची,, हेच आचरणात आणण्याची आवश्यकता आहे अन्यथा निसर्गसंहार आपण बघतच आहोत... अजूनही वेळ गेलेली नाही... ...

No comments:

Post a Comment

Liked on YouTube: ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ

ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ #Dboss, #Kumarswamy, #Mandyaelection. Darshan fan latest v...