Saturday, 21 April 2018

रासायनिक खतांचे नियोजन .


  रासायनिक खतांचे नियोजन करा.

पिकांची अन्नद्रव्यांची मोठी भूक आज रासायनिक खतातून भागवली जाते. परंतु, रासायनिक खतात विशिष्ट असे एखाद-दुसरे घटक असतात. त्यामुळे पिकास लागणारे सर्व अन्नद्रव्य संतुलितपणे या खतातून उपलब्ध होत नाहीत. तसेच या खताची कार्यक्षमताही ३० ते ६० टक्क्यांपर्यंतच असते. म्हणून जमीन रासायनिक खते, सेंद्रिय खते, जीवाणू खते इत्यादी घटकांत समन्वित व सुयोग्य वापर करून जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता कमी होऊ न देता जास्तीत जास्त उत्पादन वाढवणे आवश्यक आहे.

आपल्या देशात खताचे उत्पादन कमी असल्यामुळे ती बाहेरील देशातून आयात करावी लागतात. त्याकरता बरेच परकीय चलन द्यावे लागते. हे सर्व टाळण्यासाठी रासायनिक खतांची, सेंद्रिय व जैविक खतांची निवड पिकाच्या अन्नद्रव्याच्या आवश्यकतेनुसार. योग्य जमिनीच्या मग दुराप्रमाणे रासायनिक खतांचा समतोल व सुयोग्य वापर करून त्यांची उपयोगिता वाढवली तर आपणाला रासायनिक खतांचा योग्य मोबदला जरूर मिळेल.

नत्रयुक्त खतांचे योग्य व्यवस्थापन
बहुतेक नत्रयुक्त खते पाण्यामध्ये विरघळणारी आहेत आणि बहुतेक पिकांना संपूर्ण वाढीच्या कालावधीत नत्राची फार आवश्यकता असते. त्यामुळे नत्रयुक्त खते विभागून दिल्यास खतांचा जास्तीत जास्त उपयोग घेता येईल. दीर्घमुदतीचा व बहुवर्षीय पिकांना पाण्याची सोय असल्यास नत्रयुक्त खतांची मात्रा विभागून द्यावी.

नत्रयुक्त खते जमिनीत टाकल्यास ती मातीत चांगल्या प्रकारे मिसळावीत. नत्रयुक्त खते बहुतेक शेतकरी जमिनीच्या वरच्या थरात फेकून देतात. त्यामुळे नत्रयुक्त खताचे ब-याच प्रमाणात नुकसान होते. युरिया खत जमिनीच्या खालच्या थरात बियाखाली किंवा बियांच्या बाजूला ५ सें.मी. दूर द्यावे, त्यामुळे नत्राची ३० ते ५० टक्क्यांपर्यंत उपयोगिता वाढू शकते. पाऊस सुरू असताना युरियाऐवजी अमोनियम सल्फेट देणे अधिक फायदेशीर ठरते. नत्रयुक्त खते वापरण्यापूर्वी ओलसर मातीत मिसळून २४ ते ४८ तास तसेच ठेवून वापरल्यास पाण्याच्या निच-यामुळे व वाहून जाणा-या पाण्यामुळे होणारे नुकसान कमी होऊ शकते. निंबोळी पेंडीची व युरिया १: ५ या प्रमाणात मिश्र करून जमिनीत नत्रयुक्त खतांचा वापर केल्यास नत्रयुक्त खतांची उपयोगिता ब-याच काळापर्यंत राहू शकते.

भात पिकास २ टक्के युरियाची फवारणी फुटवे, ओंबी धरणे व दाणे भरण्याच्या अवस्थेत केल्यास ५० टक्केनत्राची बचत होते. नत्र खतांची काही मात्रा डायअमोनियम फॉस्फेट व युरियाच्या फवारणीद्वारे दिल्यास उत्पन्न कमी न होता खतांची बचत होऊ शकते.

स्फुरदयुक्त खतांचे व्यवस्थापन
स्फुरदयुक्त खते वापरताना पिकाच्या मुळांचा विस्तार / खोलीचा विचार करून वापर करणे गरजेचे आहे. कारण वरील थरात असणा-या मुळय़ांच्या पिकाला सुरुवातीला संपूर्ण मात्रा पेरून द्यावी व खोल मुळे असणा-या पिकांना मुळय़ांच्या खोलीचा विचार करून खते वापरावीत. बहुतेक पिकास स्फुरद सुरुवातीच्या काळातच आवश्यक असते. म्हणून स्फुरदयुक्त खते सुरुवातीच्या वाढीच्या काळातच आवश्यक असते. स्फुरदयुक्त खते सुरुवातीलाच देणे योग्य ठरते. जर जमिनीमध्ये खताचा परिणाम पाहिजे असल्यास आपण फवारणीतून पाण्यात विरघळणारे स्फुरदयुक्त खते देऊ शकतो. त्यासाठी ट्रिपल सुपर फॉस्फेट किंवा गरम पाण्यात काढलेल्या अर्क वापरण्याची शिफारस आहे. रॉक फॉस्फेटच्या २ ते ३ हप्त्यांपूर्वी वापर करावा.

No comments:

Post a Comment

Liked on YouTube: ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ

ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ #Dboss, #Kumarswamy, #Mandyaelection. Darshan fan latest v...