Saturday, 21 April 2018

दशरथ घास .


दशरथ घास .
▪ दशरथ हे वर्षभर चारा देणारे व्दिदल जातीचे चांगले पोषणमुल्य असलेले बहुवार्षिक चारापीक आहे.
▪ह्या चाय्राच्या मुळावर नत्रयुक्त ग्रंथी असतात. ह्या ग्रंथी हवेतील नत्र शोषत असल्याने झाडाची नत्राची भासते शिवाय नत्र शोषण क्रियेत जमिनीतील नत्राचे प्रमाण वाढून जमिनीचा कस वाढतो.
▪ दशरथ मधील हिरव्या भागातील अंदाजे पोषण मुल्य प्रथिने 22.31, स्निग्ध पदार्थ  2.61, तंतुमय पदार्थ  24.30, कर्बोदके  43.97.

◾ जमिन
ह्या चारापीकासाठी खोल मशागत केलेली योग्य आहे अशा जमिनीत ते चांगले रूचते.
सुपीक जमीनीत हे पीक घेतल्यास अधिक उत्पादन मिळू शकते.

▪ पेरणीसाठी बीज प्रक्रिया
बीज कवच कठीण असल्यामुळे पेरण्याआधी ह्या पिकाच्या बियाण्यावर गरम पाण्याने प्रक्रिया करणे आवश्यक आहे. त्यामुळे बीज कवच नरम होऊन उगवण चांगली होते. बीज प्रक्रियेसाठी पाण्याला चांगली उकळी आल्यावर पाण्याचे भांडे गॅसवरून खाली उतरून  5 मिनिटे ठेवावे पाण्याचे तापमान  80 सेल्सिअस होईल त्यात प्रक्रियेसाठी घेतलेले बी टाकून  15 मिनिटे बुडवून ठेवावे नंतर गरम पाणी निथळून बी पुन्हा गार पाण्यात रात्रभर ठेवा नंतर बी गाळून घ्या आणि सावलीत थोडा वेळ सुती कापडावर सुकवावे आता बी पेरणीसाठी योग्य झाले.

◾ पेरणी
दशरथ पेरणी वर्षभरात केव्हाही करता येते. पेरणीसाठी बी  4गुंठे क्षेत्राला 1 किलो याप्रमाणात वापरावे. पेरणी उथळ करावी. साधारण 1-2 इंच खोलीवर बी पेरावे ह्यापेक्षा जास्त पेरणी केल्यास बी उगवणार नाही. ( दशरथ ची पेरणी प्रक्रिया मेथी घास प्रमाणे करावी)

▪ खते
पेरणी वेळेस शेणखत किंवा लेंडीखत टाकावे त्याचबरोबर  10:26:26 प्रति 5 गुंठे क्षेत्राला 25 किलो टाकावे.

▪ पाणी
जमिनीचा प्रकार व तिची धरण्याची क्षमता हे पाहून आवश्यकते प्रमाणे  पाणी द्यावे ह्या चाय्राच्या मुळया जमिनीत खोलखोलवर जात असल्याने जमिनीतील खोलवरचे पाणी शोषून घेतात त्यामुळे ही झुडपे दुष्काळातही तग धरतात.

▪ कापणी
प्रथम कापणी  70 ते 90दिवसानंतर घेणे व दुसरी कापणी प्रती दिड महीना होते.
दशरथच्या कोवळ्या फांद्या व पानातून मिळत असलेल्या भरपूर प्रथिनांमुळे फांद्या जाड जाड व कठिण होण्याअगोदरच कापणी करून जनावरांना खायला द्यावे.


No comments:

Post a Comment

Liked on YouTube: ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ

ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ #Dboss, #Kumarswamy, #Mandyaelection. Darshan fan latest v...