Monday, 23 April 2018

डाळींब - मधमाशी.

      डाळींब  - मधमाशी .
                                 
     डाळींब पीकात कळी सेट होण्यात मधमाशी मुख्य भुमीका बजावत असतात. परागीभवनाच्या क्रियेत पूंकेशर ( नर
फुलातील परागकन ) हे मादी
फुलातील स्त्रीकेशरांपर्यंत ( मादी फुलातील परागकण ) वहनाच्या
क्रियेत मधमाशी सहभागी असते (हे वहन इतर कीडी व हवेच्या माध्यमातुन ही होते परंतू मधमाशी मुळे याचा वेग १० पटीने वाढतो पूंकेशर व स्त्रीकेशर यांचे
मीलन होऊन मादी फुलात
बीज धारणेची प्रक्रीया सुरू होते. यालाच आपण गाठ सेट होणे असेही म्हणतो.
    ज्या फुलात परागीकरण क्रिया घडत नाही. त्यांची बीजधारणा होत नाही. म्हणजेच त्यांची गळ होते.
बऱ्याच वेळा ज्या बागेत मधमाशीचे प्रमाण कमी असते त्या बागेत कळींची गळ मोठ्या प्रमाणात होते बऱ्याच वेळा मधाशी व्यवस्थापन व आकर्षीत करण्यासाठी बनविण्यात येणाऱ्या आमिषाची पुरेशी माहीती नसल्यामुळे मधमाशीचा पुरेपूर उपयोग घेता येत नाही. 
*मधमाशीचा पूरेपूर उपयोग घेण्यासाठी खालील बाबी काटेकोरपणे पाळाव्यात

 शक्य असल्यास मधमाशी पालन करावे.
*आमिषांचा वापर
*१) पाणी - २०० लिटर +
गुळ - २ किलो +
ताक - २-३ लिटर
या प्रमाणात गर्भ कळीच्या अवस्थेपासून ५ - ८ दिवसांनी ३ - ४ फवारण्या कराव्यात.
२) एका मडक्यात गुळ ५०० ग्रॅम व पानी ३ - ५ लिटर या प्रमाणात दूपारी बागेच्या आजुबाजुला ठेवावी.
3) बागेच्या आसपास गाजर वा कांदयाचा बियाणे प्लॉट असल्यास
मधमाशा आकर्षित होतात. त्यासाठी बागेत झेडू, मोहरी, कांदे, गाजर यासारखी पीके लावावीत.
४) बऱ्याच ठिकाणी बेदाणे झाडाला लटकवत ठेवुन मधमाशांना आकर्षित करण्यात येते.
 ५) बागेतील काही झाडांच्या पानांना गावरान मध लावले असता मोठ्या प्रमाणात मधमाशी आकर्षित होते.


No comments:

Post a Comment

Liked on YouTube: ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ

ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ #Dboss, #Kumarswamy, #Mandyaelection. Darshan fan latest v...