Saturday, 21 April 2018

पंचगव्य.

*पंचगव्य*

देशी गाईंपासून तयार केलेले एक प्रकारचे खत - टाँनीक.
हजारो वर्षांपासून भारतीय शेतीत याचा वापर केला जात आहे.

*२० लिटर साठी*( एक एकरासाठी )
ताजे ओले शेण               ५ कि.
गोमूत्र                           ३ लि.
दुध                               २ लि.
दही                               २ कि.
साजूक तूप                 १/२ कि.
गुळ                           १/२ कि.
ऊसाचा ताजा रस            ३ लि.
शहाळ्याचे पाणी              ३ लि.
जास्त पिकलेली केळी      १२
ताडी                              २ लि.
( ताडी उपलब्ध नसल्यास ३ लि. नारळाचे पाणी मातीच्या भांड्यात आठ दिवस झाकून ठेवावे  अंबून त्याची ताडी तयार होईल )

*क्रुती*

१) शेण , व साजूक तूप एका प्लास्टिकच्या  ड्रममध्ये झाकून ठेवावे. चार दिवस दररोज दोन वेळा काठी / बांबू ने ढवळावे.

२) पाचव्या दिवशी त्यात गोमुत्र , दुध ,दही , बारीक केलेला गुळ , ऊसाचा रस , ताडी व केळ्याचा बारीक केलेला लगदा टाका.

३)  पुढील पंधरा दिवस सावलीत झाकून ठेवावे व दिवसातून दोन वेळेस काठीने चांगले ढवळावे.

पंचगव्य तयार झाले.

पुढील महिनाभर हे वापरता येते परंतु झाकून सावलीत ठेवावे.

वापरण्यापूर्वी कपड्याने गाळून घ्यावे.

*वापर*

फवारणीसाठी :
२०० मीली पंचगव्य १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

आळवणी :
१० लिटर पाण्यात १ लिटर पंचगव्य मिसळून झाडाच्या मुळाच्या कार्यक्षेत्रात आळवणी करावी.

पंचगव्य ह सर्वप्रकारच्या  झाडांसाठी व पिकांसाठी  उत्कृष्ट खत व टाँनीक आहे.

घरच्याच देशी गाईपासून तयार होत असल्याने याचा खर्च नगण्य येतो.

No comments:

Post a Comment

Liked on YouTube: ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ

ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ #Dboss, #Kumarswamy, #Mandyaelection. Darshan fan latest v...