Thursday, 12 April 2018

तुती लागवड व रेशीम व्यवसाय.



 *तुती लागवड व रेशीम व्यवसाय*

● शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या शेतीपैंकी ठराविक क्षेत्रावर तुतीची लागवड करायची व उत्पादित पाल्याचा उपयोग संगोपन गृहातील रेशीम अळ्यांच्या खाद्यासाठी वापर करून त्यापासून तयार होणारे रेशीम कोष विक्री करून उत्पन्न घेणे होय. म्हणजेच कोष शेतकऱ्याने तयार करायचे व त्याच्या विक्रीतून पैसे मिळवायचे.
●जगा एकूण उत्पन्नापैंकी 82% उत्पादन हे चीन मध्ये होते व 16% उत्पादन हे भारतात होते

● *रेशीमचे प्रकार*
१)तुती रेशीम
२)टसर रेशीम
३)एरी रेशीम
४)मूगा रेशीम

यामध्ये प्रामुख्याने ८२ ते ८४% तुती रेशीमचे उत्पादन घेतले जाते.

●यामध्ये मुख्य दोन घटक आहेत
     १) *तुती उत्पादन*
     २) *रेशिम कोष उत्पादन*

●*तुती उत्पादन*
●*लागणारे भौगोलिक घटक*-
तापमान - १३ ते ४० अंश
आद्रता- ९० ते ९५%
पर्जन्यमान- ६०० ते २५००मिली
जमीन-निचरा होणारी,भुसभुशीत,सपाट व तांबडी प्रकारातील जमीन निवडावी
सामू- ६.२ ते ६.८ असावा
जमिनीची खोली ३ फूट असावी

●*लागवडीचा हंगाम* -
साधारणतः जून ते सप्टेंबर या कालावधीत याची लागवड केली जाते.

●*जात*
तुतीच्या एकूण ३५ जाती उपलब्ध आहेत त्यामध्ये महाराष्टात प्रामुख्याने *व्ही १* या जातीची लागवड केली जाते.

●*तुतीची कलमे*
 तुतीची लागवड हि कलम पद्धतीने केली जाते. साधारणतः 6 महिन्याच्या मातृवृक्षपासून हि कलमे काढली जातात.
-त्यासाठी पेस्न्सिल/बोटाच्या आकाराच्या काडीची निवड करावी.
-साधारणतः एका काडीवर ३ डोळे असावेत,डोळे फुटलेले नसावेत.
-काडीला खालच्या बाजूने तिरपा कट द्यावा.
-लागवडी पूर्वी कलम १% बविस्टीन या बुरशीनाशकाच्या द्रावणात आर्धा तास बुडवावेत.
-मुळांची चांगली वाढ होण्यासाठी खालच्या भागात रुटलेक्स पावडर चोळावी.

● *लागवड*
-तुतीची लागवड ही पट्टा पद्धतीने केली जाते या पद्धतीलच 'इंडो-जपान पद्धत' असेही म्हणतात.
यात खालील अंतरावर लागवड केली जाते
५×३×२ फूट, ५×२×१ फूट व ६×2×1फूट
-दोन साऱ्यांमधील आंतर 3 फूट, दोन पट्टयातील अंतर ५ फूट व दोन झाडातील अंतर 2 फूट याप्रमाणे लागवड केली जाते.
-लागवड करताना कलम उभा जमिनीत १ किंवा २ डोळे जमिनीच्या बाहेर राहतील अश्या पद्धतीने खोचवा.
-तिरकस(झिगझ्याग) पद्धतीने लागवड करावी.

● *खत व्यवस्थापन*
१ ले वर्ष-
१ ली मात्रा दोन ते तीन महिन्यात एकरी २४ किलो नत्र द्यावे.
२ री मात्रा 3 ते ४ महिन्यात एकरी २४ किलो पालाश द्यावे
२ऱ्या वर्षांपासून एकरी ४८:२४:२४ किलो नत्र,स्फुरद,पालाश द्यावे.

आवश्यकतेनुसार सुक्क्ष अन्नद्रव्यांचा वापर करावा.

● लागव झाल्यानंतर पाचव्या महिन्यापासून तुतीचा पाला रेशीम कीटकांना खाण्यासाठी दिला जातो.
●तुती झाड लागवडी नंतर साधारणतः १५ वर्ष उत्पन्न देते.

● *रेशीम कीटकांचे संगोपन*

● *संगोपन गृह*
-रेशीम कीटकांचे संगोपन गृह बांधताना ते मोकळ्या जागी व धूळ प्रदूषण युक्त जागेपासून दूर असावे.
-संगोपन गृहाच्या बाजूच्या भिंतीची उंची १० फूट असावी व मधील उंची १२ ते १४ फूट असावी.
-रुंदी २० फूट व लांबी ५० फूट असावी.

●रेशीम कीटकाच्या पाच अवस्था असून पहिल्या दोन अवस्थाना बाल्यावस्था व उर्वरीत तीन अवस्थाना प्रौढावस्था म्हंटले जाते. साधारणतः अंडी अवस्थेपासून २५ ते २८ दिवसात कोषाची विक्री केली जाते.

● *जात* - रेशीम कीटकांच्या अनेक जाती आहेत परंतु महाराष्ट्रात प्रामुख्याने बायोव्हटाइन या कीटकांचे संगोपन केले जाते.

●साधारणतः १०० अंडीपुंजपासून ५५ ते ११० किलोपर्यंत रेशीम निघतो. एका अंडीपुंजात ४०० ते ५०० अंडी असतात.

●अंडी संगोपन गृहात आणल्या नंतर निर्जंतुकीकरण,ब्लॅक बॉक्सिंग,हयाचींग,ब्रशिंग इत्यादी कामे केली जातात.
●सुरवाती काळात तुतीचा पाला हा बारीक करून व नंतरच्या काळात तसाच रेशीम कीटकांना खाऊ घातला जातो.
● तुती रेशीम उद्योगासाठी शासनाकडून प्रशिक्षण तसेच सबसिडी देखील दिली जाते.

No comments:

Post a Comment

Liked on YouTube: ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ

ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ #Dboss, #Kumarswamy, #Mandyaelection. Darshan fan latest v...