मुट्टई रस्सम
भारताच्या दक्षिण प्रांताची, देशाला मिळालेली ही एक बहुमूल्य निविष्टा आहे. अंड्याला तमीळ भाषेत मुट्टई व मल्याळी भाषेत मुट्टा हे संबोधन आहे. त्या अर्थी मुट्टई म्हणजे अंडे व रस्सम म्हणजे त्यापासून बनविलेला रस किंवा अर्क किंवा द्रावण. मुट्टई रस्सम हे वाढवर्धक व संजीवक म्हणून जरी प्रचलित असले तरी पिकाच्या प्रजोत्पादन कालावधीत पिकाला आवश्यक असलेले हार्मोन्स पुरविणारा महत्वपूर्ण घटक आहे.
🍁🍁🍁 साहित्य 🍁🍁🍁
🔘- काचेची किंवा प्लस्टिकची झाकण असलेली बरणी अथवा पात्र.
🔘- २०-२५ मोठ्या आकाराचे पिवळे पिकलेले लिंबू.
🔘- १० ते १५ बदकाची किंवा कोंबडीची अंडी.
🔘- ५०० ग्रॅम गुळ.
लिंबू कापून त्याचा रस पिळून काढावा व त्यात २५० ग्रॅम गुळ मिसळावा. अंडी न फोडता बरणी किंवा पात्रात ठेवा. गुळ कालवलेला लिंबांचा रस त्यात टाका. अंडी या द्रावणात पूर्णपणे बुडत नसतील तर आणखी लिंबांचा रस टाका किंवा १-२ अंडी कमी करा. अंडी द्रावणात पूर्णपणे बुडणे आवश्यक आहे. काही तज्ञांच्या मतानुसार पिळलेल्या लिबांच्या सालीही यात टाकतात. यानंतर बरणीला झाकण लावा व सावलीच्या, सामान्य तापमान असेल अशा ठिकाणी १० दिवस ठेवा. यादरम्यान लिंबाच्या रसातील साइट्रिक आम्लात अंड्याच्या कवचातील कॅल्शीयम विरघळू लागते. १० दिवसात अंड्याच्या कवचातील कॅल्शीयम पूर्णपणे विरघळणे अपेक्षित आहे. त्यानंतर अंड्याच्या आतील बिलबिलित पापुद्रा शिल्लक राहतो पण अंडी फुटलेली नसतात.
आपले हात स्वच्छ धुऊन हाताने अंडी फोडून द्रावणातच कुस्करावे. उरलेले २५० ग्रॅम गु्ळ थोड्याश्या पाण्यात कालवून या द्रावणात मिसळावे. बरणीस झाकण लावून हे द्रावण पुन: १० दिवस ठेवावे. १० दिवसानंतर गाळून वापरण्य़ास घ्यावे किंवा लगेच वापरणार नसल्यास काचेच्या अथवा प्लास्टिकच्या पात्रात झाकण लावून ठेवावे.
🍁🍁🍁 कसे वापरावे 🍁🍁🍁
१ लिटर पाण्यात १० ते १५ मिली मिसळून पिकांवर फवारणी व जमीनीतून देण्यासाठी वापरावे.
पिकाच्या बदलाच्या अवस्थेत याची फवारणी करावी.
द्रावण गाळून घेतल्या पासून ६ महिन्याच्या आत याचा उपयोग करावा.
🔘- अंड्याच्या कवचातील विरघळलेला कॅल्शियम पिकाच्या पान व देठातील अन्नद्रव्य फुल व फळधारणेसाठी उपलब्ध करतो.
🔘- अंड्याच्या बलकात असणारे विविध प्रकारचे अॅमीनो अॅसीड फळधारणे दरम्यान फळांना फुगवण व चकाकी प्रदान करतात.
🔘- गुळ हा जगभरातील निविष्टांमधे उत्कृष्ट संजीवक म्हणून वापरला जातो.
💥💥💥 महत्वाचे 💥💥💥
लिंबू व्यवस्थित पिकलेले नसतील तर त्यांच्या रसातील आम्लता कमी असते. परीणामी अंड्याचे कवच त्यात पूर्णपणे विरघळत नाही किंवा पूर्ण विरघळण्यास १० दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागतो. या करीता पिवळे व आकाराने मोठे लिंबू निवडावेत.
अंडी कोंबडीची असतील तर गावरान किंवा विलायती किंवा ब्रॉयलर यापैकी कुठलीही चालतात कारण त्यांच्या कवचातील केवळ कॅल्शीयम हा घटक अपेक्षित आहे.
२०-२५ लिंबू व १०-१५ अंडी असे प्रमाण देण्याचे कारण की दोघांच्या लहान मोठ्या आकारामुळे हे प्रमाण दर वेळेस वेगवेगळे होऊ शकते.
No comments:
Post a Comment