Tuesday, 27 March 2018

फळ वनस्पति संजीवक.


फळ वनस्पति संजीवक
🍁🍁🍁 साहित्य 🍁🍁🍁
🔘- १०० लिटर पाणी
🔘- १२ ते १५ किलो गुळ
🔘- ४० किलो फळे, फळभाज्या व वनस्पती
   फळे - पिकलेली किंवा टाकाऊ फळे , डाळिंब, केळी, द्राक्ष, पेरु, चिकु, संत्री, मोसंबी, लिंबु, टोमॅटो इ. जी आपल्या शेतात उपलब्ध आहेत
   फळभाज्या - पालेभाज्या, हिरवी मिरची, लसूण, कांदा इ.
   वनस्पती - जास्वंद, शेवगा पाने, गव्हांकुर, पपई पाने, कडुलिंब, गुळवेल पाने, रुईमदार, निरगुडी, सिताफळ, झेंडु संपुर्ण वनस्पति, कोरफड, आंब्याची पाने, पेरुची पाने,
🔘- वरील सर्व साहित्य मावेल अशा आकाराचा प्लास्टिकचा ड्रम

🍁🍁🍁🍁🍁🍁
✅- किण्वन प्रक्रियेसाठी गुळ हे उत्कृष्ट नैसर्गिक माध्यम आहे. गुळ किण्वन प्रक्रिया जलद घडवतो. याशिवाय गुळातील अन्य घटकही संजीवकात उपलब्ध होतात.
✅- तणे व विविध भाज्या फळे टाकल्याने त्यातील पोषक घटक संजीवकात येतात.(जसे माणुस आजारी पडला तर फळे खाऊन विविध विटामिन उपलब्ध करुन घेतो तसे हे वनस्पति साठी उपलब्ध होतात) .
✅- लहसुन मिरची, अदरक व कांदा किडप्रतीबंधक म्हणुन काम करतात.
✅- जास्वंद, शेवग्याचा पाला, गव्हांकुर, सप्तधान्य यातील पोषक घटक वाढवर्धक टॉनिक म्हणुन काम करतात व पिकात प्रतिकार क्षमता निर्माण करतात.
✅- सिताफळ पाला किडरोधक म्हणुन तर झेंडु सुत्रकृमी नाशक म्हणुन काम करतात.
✅- पपईपाला कडुलिंब पाला, गुळवेल पाला, रुईमंदार, निरगुडी पाला बुरशी नाशक म्हणुन काम करतो. कडुलिंबाची पाने टाकल्यास त्यातील अझोडिरेक्टीन हे रसायन यात येते. किटनाशक / किडरोधक म्हणून काम करते. याच्या गोड आंबट वासाने किड पळ काढतात, पिक खात नाही.
या सर्व साधनांच्या समवेशामुळे हे एकच द्रावण टॉनिक, बुरशी नाशक व किडरोधक म्हणुन काम करते

🍁🍁🍁 कसे बनवावे 🍁🍁🍁
फळे व भाजीपाला यांचे बारीक तुकडे करावेत. त्यात गुळ कुस्करून टाकावा. व्यवस्थित मिसळून ड्रममधे टाकावे व त्यात १०० लिटर पाणी टाकावे. ड्रमचे तोंड स्वच्छ फडक्याने बांधून झाकावे. दिवसभरात ज्या ठिकाणी तापमान सामान्य असेल अशा सावलीच्या ठिकाणी ठेवावे. किण्वन प्रक्रिया पूर्ण होऊन संजीवक तयार होण्यास ऋतू व ठिकाणाच्या विविधते नुसार ५० ते ६० दिवस लागतात. या दरम्यान दर पाच ते आठ दिवसानंतर हे द्रावण लाकडी काठीने ढवळावे. या कालावधी नंतर हे द्रावण गाळून घ्यावे. सुरक्शित ठिकाणी योग्य प्रकारे संग्रह केल्यास हे द्रावण १० वर्षांपर्यंत साठवले व वापरले जाऊ शकते.

🍁🍁🍁 कसे वापरावे 🍁🍁🍁
🔘- पिकावर फवारणी साठी १ लिटर पाण्यात ४ ते ६ मिली संजीवक.
🔘- जमीनीतून पा्टपाण्याद्वारे अथवा ड्रिपद्वारे देण्यासाठी  २०० लिटर पाण्यात   ५ लिटर संजीवक एक एकरास वापरावे.

🍁🍁🍁 जीवाणु संजीवक 🍁🍁🍁
फळ संजीवकापासून बेणे व बीज प्रक्रियेसाठी उत्कृष्ट प्रकारचे जीवाणू संजीवक तयार करता येते. यासाठी  एका बाटलीत हे संजीवक घेऊन त्यात द्विदल पिकांच्या मुळ्यांवरील रायझोबीयम जीवाणूंच्या गाठी व मुळ्यांवरील माती, एकदल पिकाच्या मुळ्यांवरील माती व बांधावरची माती विरजण म्हणून टाका व ढवळून घ्या. १२ तासानंतर हे जीवाणु संजीवक  बेणे व बीज प्रक्रियेसाठी वापरावे.
🔘- बीजप्रक्रियेसाठी  १ लिटर पाणी + ५०० मिली जीवाणु संजीवक.
🔘- बेणेप्रक्रियेसाठी १ लिटर पाणी + ३०० ते ५०० मिली जीवाणु संजीवक.
🔘- मिलीबग साठी १लिटर पाणी + १ ते २ मिली जीवाणु संजीवक.
बियाणे अथवा बेणे किती प्रमाणात आहेत त्यानुसार जीवाणू संजीवक बनवावे. उरल्यास पाण्याबरोबर जमीनीत सोडावे.

फळ संजीवक तयार करण्यास  ५० ते ६० दिवसाचा कालावधी लागतो म्हणुन आधीच तयार करुन ठेवावे.
यात मोड आलेले सप्तधान्य पण टाकू शकता.
काही पिकांना ससे व हरणे बाल्यवस्थेत खातात, संजीवकाची फवारणी केल्यास आंबट गोड वासाने खात नाही तेथुन पळ काढतात.
याच्या वासाने मधमाश्या मुंगळे आकर्षित होऊन परागीकरण प्रभावी होऊन उत्पादन वाढते.
कांद्यावर फवारणी व जमीनीतुन दिले असता थ्रीप्स नष्ट होऊन कांद्याची पात गुडघ्याच्या वर वाढली म्हणजेच उत्पादन वाढ.
फळपोषणाच्या काळात फवारणी केल्यास  फळे मोठी वजनदार तयार होतात. फळ तडकणे वगैरे समस्या येत नाही.


No comments:

Post a Comment

Liked on YouTube: ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ

ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ #Dboss, #Kumarswamy, #Mandyaelection. Darshan fan latest v...