Thursday, 22 March 2018

बाजरी पिठापासून अळीनाशक द्रावण बनवणे

55667719
बाजरी पिठापासून अळीनाशक द्रावण बनवणे

बहुतांश शेतकरी बांधव कीड व अळी नियंत्रणासाठी रसायनात भरपूर पैसे घालवतात..

*(रासायनिक औषधामुळे अन्नधान्य/भाजीपाला/फळ यांच्यात विषाचे कण जातात)*

प्रामुख्याने रसायनांचा वापर हा भाजीपाला वर्गीय पिकांसाठी होतो .

 *भाजीपाला म्हंटल कि अळीची समस्या हि फार मोठी बाब आहे*.

 रसायन फावारलेला भाजीपाला आपल्या आरोग्यासाठी किती हानिकारक आहे हे आपण जाणता …. आज आपण *ऑरगॅनिक शेतीकडे* एक पाऊल पुढे टाकण्याचा निश्चय करूयात...


या आधी आपण वाचले/ ऐकले असणार पण केले नसणार तर आता आवश्य करावे.. नाहीतर ऑरगॅनिक शेतीकडे आपण फक्त किनाऱ्यावरच उभे राहणार…पूढे जाण्यासाठी त्या दृष्टीने एक एक पाऊल पुढे टाकावे लागेलच...

*अत्यंत कमी खर्चात रामबाण नैसर्गिक उपाय अळी नियंत्रणासाठी करूयात*

1) एक किलो बाजरीचे पीठ
*(प्रत्येक शेतकरी बांधवांच्या घरी असेलच)*

2)एक बारके तोंड असलेले १५ लिटरचा प्लास्टिक कॅन.

*(आपल्या कडे असेल.. नसेल तर 15-20₹ कोणत्याही मोठ्या किराणा दुकाना वर सहज मिळेल)*

3) 10लिटर पाणी

कृती--

एक किलो बाजरीचे पीठ10 लिटर पाण्यात व्यवस्थित मिश्रण करून घ्यावे.

आता हे तयार झालेले मिश्रण १५ लिटर च्या डब्यात टाकावे.

आता डब्याचे तोंड झाकून व्यावस्थित हवाबंद करावे.

आता हा डब्बा उकिरड्यात ( शेण टाकायची जागा )
3-4 फुट खोल खड्डा करून तिथे ठेवावा आणि परत वरून शेण टाकून खड्डा पुरून द्यावा.

जागा लक्षात राहावी यासाठी एखादी खूण लक्षात ठेवावी.

*( ज्यांच्या कडे उकिरडा (गुरे) नसेल ते इतर शेतकरी बांधव किंवा नातेवाईक मंडळी कडे हि व्यवस्था करू शकतात )*

साधारणपणे 45 ते 60 दिवस हा डब्बा पुरून ठेवावा.

त्या कालावधी नंतर हा डब्बा बाहेर काढून सरळ फवारणीसाठी वापरता येईल.

हे बाजरी मिश्रण 2 मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावता येते.
(15 लिटर पंप साठी 30 मिली)

साधारण पणे 250 ते 300 पंप ची फवारणी त्या द्रावणाने करता येईल।

_( किमान 20 ₹ ते 60₹ प्रति पंप रासायनिक औषधा चा खर्च गृहीत घेतला तरी *5000₹ ते 18000₹* एवढा आपला खर्च बचत होईल )_

या नुसार आपल्याला किती प्रमाणात हवे तशी डब्याची संख्या वाढवता येईल किंवा 1 डब्बा द्रावण तयार झाल्यावर दुसरा डब्बा ठेवता येईल।


या द्रावणा मध्ये मोठ्यात मोठी आली मारण्याची क्षमता आहे।

ऑरगॅनिक शेतीकडे..
https://t.me/organicshetikade

No comments:

Post a Comment

Liked on YouTube: ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ

ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ #Dboss, #Kumarswamy, #Mandyaelection. Darshan fan latest v...