Sunday, 6 May 2018

मिरची लागवड तंत्रज्ञान.

मिरची लागवड तंत्रज्ञान.
मिरचीच्या जाती :
जमीन आणि हवामान :
मध्यम ते काळी आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकास योग्य असते. हलक्‍या जमिनीत योग्य प्रमाणात खते घातल्यास चांगले पीक येऊ शकते. उष्ण आणि दमट हवामानात पिकाची वाढ जोमदार होते व उत्पादन चांगले मिळते. हिवाळी हंगामात २० ते २५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान असल्यामुळे पिकाची वाढ चांगली होत नाही. त्यामुळे फुलधारणा व फळधारणा कमी होते.

लागवडीचा हंगाम :
खरीप हंगाम : पेरणी मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून जून अखेरपर्यंत.
रोपांची लागवड :

खत व्यवस्थापन :
लागवडीसाठी वाफे तयार करण्यापूर्वी २० ते २५ टन चांगले कुजलेले शेणखत प्रती हेक्‍टरी जमिनीत मिसळावे. १००: ५०:५० किलो नत्र : स्फुरद : पालाश प्रती हेक्‍टरी द्यावे. अर्धा नत्राचा हप्ता लागवडीनंतर ४ ते ६ आठवड्यांनी म्हणजे फूल आणि फळधारणेच्या वेळी द्यावा. खतांची मात्रा दिल्यानंतर ताबडतोब पाणी द्यावे.

आंतरमशागत : 
आवश्‍यकतेनुसार खुरपणी करून पीक स्वच्छ ठेवावे. जमिनीलगत हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. फुले येण्याच्या सुमारास झाडांना भर द्यावी म्हणजे झाडे कोलमडणार नाहीत.

पाणी व्यवस्थापन :
पाणी गरजेपेक्षा जास्त किंवा कमी झाल्यास फुलांची गळ होते. जमिनीचा प्रकार वा मगदूर, पाऊसमान, तापमान व हंगामानुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पावसाळ्यात गरजेप्रमाणे १५ दिवसांच्या अंतराने तर उन्हाळ्यात ५ ते ६ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. झाडे फुलावर असताना पाण्याचा ताण पडल्यास फुले आणि फळ गळण्याचा धोका असतो. म्हणून या कालावधीत पाण्याचा ताण पडू देऊ नये. शेतीबाबत सर्व सेवांची माहितीसाठी

No comments:

Post a Comment

Liked on YouTube: ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ

ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ #Dboss, #Kumarswamy, #Mandyaelection. Darshan fan latest v...