Tuesday, 24 April 2018

Lactic Acid Bacteria।



Lactic Acid Bacteria (LAB) किंवा
दुग्धाम्ल जीवाणू .

●साहित्य
१ ली मेपल इ.एम.1
२ किलो गुळ
१८ ली पाणी
हे तिनीपन एकत्र मीसळुन २० ली हवाबंद कॅन मधे ५ ते ६ दिवस सावलीत झाकुण ठेवावे. व दररोज सकाळी कॅनमधील हवा सोडावी.मणजे
द्रावण तयार होईल.

● साठवण
थेट सूर्यप्रकाशात ठेवू नये.
सामान्य तापमानात साठवण करायची असेल तर द्रावणा इतक्याच आकारमानाचा गुळ कुस्करून द्रावणात मिसळवा व लाकडी काडीने व्यवस्थित ढवळून घ्यावे.

● कसे वापरावे
जमीनीतून एकरी 1बाॅटल. व
फवारणिसाठी तयार केलेले 10 मिली 1 लिटर पाणि.

० उपयोग :—

जमीनीतील माती भुसभुशीत होऊन जमीनीत हवा खेळती राहते.
पिकांच्या प्राथमिक अवस्थेत शाखीय वाढीसाठी पिकावर फवारावे.
फळांच्या फुगवणीसाठी फळधारणेच्या कालावधीत फवारणी करावी. एकदा फुगवण झाल्यानंतर मात्र अतिरीक्त फवारणी करू नये.

EM सोल्युशनमधे हे घटक प्रामुख्याने असतातच  - photosynthetic bacteria (प्रकाश संश्लेषक जीवाणू),
 - Lactobacillus किंवा lactic acid bacteria,
 - yeasts (यीस्ट)

photosynthetic bacteria किंवा प्रकाश संश्लेषक जीवाणू - हे जीवाणू सूर्यप्रकाशाच्या मदतीने स्वत:चे अन्न निर्मिती करतात. पिकांच्या मुळातून निघणारे विविध स्त्राव, जमीनीतील सेंद्रीय पदार्थांचे अंश व वातावरणातील अमोनिया यांपासून अमीनो ऍसीड, न्यूक्लिक ऍसीड्सची व शर्करेची (साखर) निर्मिति करतात. जे पिकाच्या मुळ्यांना तयार स्वरूपात सहजगत्या उपलब्ध होउन जलदगतीने पोषण व वाढ होण्यास मदत होते. याव्यतिरीक्त जमीनीतील विविध प्रकारच्या जीवाणू व नत्राणू वाढीस प्रोत्साहन मिळते.

Lactobacillus किंवा lactic acid bacteria - हे जीवाणू कार्बोहायड्रेट्स व शर्करेचे रूपांतर lactic acid मधे करतात. यातील अंगभूत निर्जंतुकीकरण गुणधर्मामुळे जमीनीतील नेमेटोड्सच्या वाढीवर नियंत्रण होते. जमीनीतील विविध सेंद्रीय घटकांचे विघटन घडवण्यात या जीवाणूंचा खूप मोठा सहभाग असतो.

yeasts (यीस्ट) - वनस्पतीच्या पेशीविभाजन व मुळांच्या वाढीसाठी आवश्यक हार्मोन्स व एंझाइमचि निर्मिती करण्याचे काम यीस्टमुळे होते. यीस्ट प्रकाश संश्लेषक जीवाणूंनी तयार केलेल्या शर्करा व अमीनो ऍसीडचा वापर करून lactic acid bacteria वाढीसाठी पूरक द्रव्ये बनवतात.

अशाप्रकारे EM सोल्युशन मधील विविध प्रकारचे जीवाणू एकमेकांना पूरक व सहायभूत परीस्थिती निर्माण करून पिकाच्या वाढीसाठी आवश्यक अन्न्द्रव्ये, सूक्ष्मद्रव्ये व एंझाइम्सची निर्मिती करतात.

No comments:

Post a Comment

Liked on YouTube: ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ

ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ #Dboss, #Kumarswamy, #Mandyaelection. Darshan fan latest v...