आंबा लागवड.
🍁आंबा लागवडीसाठी 10 x 10 मीटर अंतरावर शिफारस केलेली आहे. परंतु आता आंबा लागवड ही घन पद्धतीने म्हणजेच 5 x 5 मीटर किंवा 5 x 6 मीटर अंतरावर केल्यास उत्पादन अधिक मिळते. या लागवडीत झाडातील अंतर 10 ते 12 वर्षांपर्यंत मिळून येत नाही. त्यामुळे आपणास या बागेतून चारपट उत्पादन मिळते.
🍁आंब्याच्या लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची एक मीटर खोल, काळी व त्या खाली नरम मुरूम असलेली जमीन चांगली. जमिनीचा सामू 6.5 ते 8.0 इतका असावा. मात्र 10 टक्क्यांपेक्षा जास्त चुनखडी असलेली जमीन आंबा लागवडीसाठी टाळावी.
🍁जमिनीच्या पोताप्रमाणे 8 x 8 किंवा 10 x 10 मीटर अंतरावर 1 x 1 x 1 मीटर आकाराचे खड्डे खोदावेत. खड्ड्याच्या तळाशी 20 ते 25 सें.मी. जाडीचा वाळलेल्या पालापाचोळ्याचा किंवा गवताचा थर द्यावा. असे करताना त्यात 50 ग्रॅम कार्बारिल पावडर धुरळावी. त्यानंतर या खड्ड्यात तीन टोपली चांगले कुजलेले शेणखत, एक किलो सुपर फॉस्फेट, चांगली कसदार काळी माती आणि 100 ग्रॅम कार्बारिल पावडर यांचे मिश्रण करावे. हे मिश्रण खड्ड्यावर थोडी शीग येईल इतके भरून घ्यावे. जमीन भारी असेल तर त्यात 30 टक्के चांगला मुरूम मिसळावा. मात्र हलकी असेल तर 60 टक्क्यांपर्यंत गाळ मिसळावा.
🍁घन लागवडीची पद्धत :
आंबा लागवडीसाठी 10 x 10 मीटर अंतरावर शिफारस केलेली आहे. परंतु आता आंबा लागवड ही 5 x 5 मीटर किंवा 5 x 6 मीटर अंतरावर करणे जास्त फायद्याचे दिसून आले आहे. या अंतरावर झाडातील अंतर 10 ते 12 वर्षांपर्यंत मिळून येत नाही; म्हणजे तोपर्यंत आपणास या बागेतून चारपट उत्पन्न मिळते. कारण 10 x 10 मीटर अंतरावर आंबा लागवड केल्यास हेक्टरी 100 झाडे बसतात. तर 5 x 5 मीटर अंतरावर लागवड केल्यास हेक्टरी 400 झाडांची संख्या ठेवणे शक्य होते. या पद्धतीमध्ये झाडांचा घेर व उंची मर्यादित ठेवता येते. त्यासाठी छाटणी आणि वाढनिरोधकांचा वापर करता येतो. 🥦इजिप्त आणि दक्षिण आफ्रिकेत तर 3 x 1 मीटर इतकी कमी अंतरावर लागवड यशस्वी झाली आहे. त्यात हेक्टर 3333 झाडांची संख्या असते. गेल्या पाच वर्षांत आपल्याकडे सुद्धा 2 x 4 मीटर, 3 x 5 मीटरवर आंबा लागवड होत आहे. दाट लागवड करावयाची असल्यास घेराचा आकार मर्यादित ठेवणे आवश्यक आहे.
🥦घन लागवडीचे फायदे :
🍁ठराविक क्षेत्रातून अधिक उत्पादन, 🍁झाडे लहान असल्यामुळे फळांची विरळणी, फवारणी, छाटणी इत्यादी गोष्टी करणे सोपे होते, 🍁आंबा फळांची काढणी खुडी व झेला न वापरता हाताने करणे शक्य होते,
🍁फळांची गुणवत्ता व प्रत सुधारण्याचे वेगवेगळे उपाय करणे सहज शक्य होते.
🍁आंबा लागवडीची आधुनिक इनसिटू पद्धत :
इनसिटू पद्धत म्हणजे जागेवर कोयी लावून त्यावर नंतर योग्य वेळी कलमीकरण करणे होय. या पद्धतीचा अवलंब केल्यास बराच फायदा दिसून येतो.
🍁जागेवरच कोय लागवडीमुळे रोपाचे सोटमूळ कोणत्याही अडथळ्याविना जमिनीत सरळ खोल जाते. कलमांची मुळे मात्र पिशवीत केलेली असल्यामुळे त्यांची पिशवीत गोल वेटोळी चुंबळ बनते. त्यामुळे खड्ड्यात लागवड केल्यानंतर ती जमिनीत खोलवर जाऊ शकत नाही. हलक्या, मुरमाड जमिनीत हा प्रश्न आणखीनच गंभीर होतो.
🍁इनसिटू पद्धतीने लागवड केली असल्यास झाडांची वाढ जोमदारपणे होते.
🍁अशा झाडांना रोग व किडींचा प्रादुर्भाव तुलनेने कमी प्रमाणात जाणवतो.
🍁एका रोपास बाजूच्या दोन-तीन रोपांचा जोड दिलेला असल्याने कलमात तीन-चार रोपांची एकदाच ताकद मिळून कलम अति शीघ्रतेने वाढते.

No comments:
Post a Comment