Sunday, 29 April 2018

झिरो बजेट हळद व् अद्रक आले लागवड।

झिरो बजेट शुन्य खर्चाची
हळद व् अद्रक आले लागवड व योग्य सहजीवन सापळापिके....

☘1) जमीन ही मध्यम व निचऱ्याची असावी. शक्यतो पानी पकडनारी नसावी.
☘2) मे महिन्याच्या सुरुवातीला 3 फुट अंतरावर बेड करावेत 2 बेड मध्ये 1.5 फुट अंतर असावे, तसेच मधील अंतराची खोली ही कमीत कमी 1.5फुट असावी.
☘3) बेड च्या मधोमध ड्रिप लाइन टाकून घ्यावी. ड्रिप वापरल्यास वाफसा चांगला राहतो. तसेच बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो.
☘4) एकरी 400 किलो घनजीवामृत शेवटच्या पाळीत द्यावे.
☘5) लागवडी साठी योग्य काळ 15 मे ते 15 जून सर्वोत्तम
☘6) बेणे हे कमीत कमी 30 ग्राम वजनाचे असावे. zizzag पद्धतीने 9 इंच अंतरावर एक एक बेणे लावावे. तत्पूर्वी बेण्यास बिजसंस्कार करावे.
☘7) तसेच 10 X 10 अंतरावर गावरान एरंडी किंवा शेवगा (सुधारित संकरित नव्हे) लावावा.
अथवा नऊ फुटावर बेडवर शेवगा किंवा तुर लावावी
सरीच्या दोनी बाजुला मिरची लावा. झेंडूही लावावा . मधे - मधे व सभोवताली दोन चार ओळी
मकाही टोकावा.
☘8) एकरी 700 ते 800 किलो बेणे वापरावे
☘9) पूर्ण बेणे लावणे झाल्यावर पाचटाचे आछादन करावे जेणेकरुण तीव्र उष्णतेचा बेण्यावर परिणाम होणार नाही.
☘10) एकरी 200 लि. जीवामृत महिन्यातून दोनदा द्यावे. तसेच ,जीवामृत व् दशपर्णी अर्क यांची आलटुन् - पालटुन फवारणी करावी. थंडीच्या दिवसात आंबट ताक व सप्तधान्यंकुर याची महिन्यातून 2 वेळा फवारणी घ्यावी जेणे करुन करपा प्रतिबन्ध होईल
☘11) पानी हे वाफसा स्थितित ठेवावे.
अंदाजे 9-10 महिन्यात काढणी योग्य होईल.
जीवामृताचा वापरामुळे बुरशीजन्य रोग येत नाहीत.

         

No comments:

Post a Comment

Liked on YouTube: ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ

ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ #Dboss, #Kumarswamy, #Mandyaelection. Darshan fan latest v...