Saturday, 21 April 2018

एकात्मि कीड व्यवस्थापनाची मुलतत्वे.

एकात्मि कीड व्यवस्थापनाची मुलतत्वे.



क) किडीवरील सूक्ष्म रोगजंतू:

१) सूक्ष्म जिवाणू:

बॅसिलस थुरीनजिनेसिस (बी. टी)
कोबिवरील चौकोनी ठिपक्याचा पतंग, वांगी, भेंडीवरील शेंडा व फळे पोखरणारी अळी, कापसावरील बोंडअळी, घाटेअळी, तंबाखूवरील पाने खणारी अळी, भातावरील खोड किडा, पाने गुंडाळणारी अळी, डाळिंबावरील सुरसा, लिंबूवर्गीय फळझाडवरील पाने खाणारी अळी इत्यादींच्या नियंत्रणासाठी उपयुक्त.

प्रसारण मात्रा: ०.५ – १.० कि. ग्रॅ./ हेक्टर

२) विषाणू- (एन. पी. व्ही.)

 हेलिओकिल, मॅजिक, स्पिलोसाईड
हरभर्यावरील घाटेअळी, तंबाखूवरील पाने खाणारी अळी, भुईमूग, सूर्यफूलावरील केसाळ अळींच्या नियंत्रणासाठी या विषाणू च वापर करतात.

प्रसारण मात्रा: २५० ते ५०० एल. ई/ हेक्टर


३) परोपजीवी बुरशी:

शत्रू किडींच्या अंगावर या बुरशीची वाढ होते. अशा बुरशीच्या वाढीचा प्रकार व रंग वेगवेगळे असतो. बुरशीग्रस्त अळी कडक होते.

अ) व्हर्टीसिलीअम लेकानी:

 व्हर्टीसिलीअम बुरशी रस शोषणार्या मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, पिठ्या ढेकूण व खवले किडींची पिल्ले या मृदु शरीरवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी उपयुक्त.

प्रसारण मात्रा;५ ग्रॅम/लिटर पाणी (२ * १० बिजाणू कण/ ग्रॅम )

ब) बिव्हेरिया बॅसीयाना:

 बिव्हेरिया परोपजीवी बुरशी,पतंगवर्गीय, भुंगेरे वर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी उपयुक्त. उदा. हुमणी कीड, नारळावरील गेंडा भुंगेरे, सोंड किडे, उसावरील पायरीला, आंब्यावरील तुडतुडे, वाळवी ई.


क) न्यूमोरिया रियेली:

न्यूमोरिया बुरशी सोयाबीन, बटाटा, कापूस व इतर पिकांवर येणार्या स्पोडोप्टेरा व इतर अळयांच्या नियंत्रणासाठी.
प्रसारण मात्रा;५ ग्राम/ लिटर पाणी.


ड) हिरसुटेला थोंम्पसोनी:

 नारळावरील कोळी व इतर पिकांवरील लाल कोळीच्या नियंत्रणासाठी उपयुक्त.


इ) पॅसिलोमायसिस लिल्यासिनस:

 मुळावरील गाठी करणार्या सूत्रकृमी च्या नियंत्रणास उपयुक्त.


ई) ट्रायकोडर्मा:

 ट्रायकोडर्माबुरशीमर रोग, मूळ कुज, खोड कुज, कंद कुज, पणामा विल्ट, रेड रोट, या रोगांच्या नियंत्रणासाठी. प्रसारण मात्रा; ५ ग्राम/ लिटर पाणी

४) परोपजीवी सूत्रकृमी:

 स्टेनरनेमा कारपोकॅप्सी व हेटेरोर्हबडिस प्रजातीच्या सूत्रकृमी हुमणी, देठ कुरतडणारी अळी, भातावरील खोड किडा, तंबाखूवरील पाने खाणारी अळी, घाटे अळी, नारळावरील काळ्या डोक्याची अळी, कोबीवरील ठिपक्यांचा पतंग, बटाटा पोखरणारी अळी या सर्व किडींच्या नियंत्रणासाठी उपयुक्त.

मात्रा; १ लाख रोगकारक नुकतेच जन्मलेले सूत्रकृमी/ हेक्टर


ड) तणावरील परभक्षी कीटक:

 १) झायग्रोग्रामा भुंगेरे:

अळी व प्रौढ कॉंग्रेस गवतावर राहतात आणि कळ्या, पाने, फुले यावर उपजीविका करतात. हे भुंगेरे तनग्रस्त भागात उपद्रवानुसार पावसाळ्याच्या सुरूवातीला जुन- जुलै महिन्यात प्रासारित करावीत.


इ. रासायनिक पद्धती.

रासायनिक कीडनाशकांचा वापर :-

 जगभरातील ग्राहकांची गरज लक्षात घेता अन्न पिकवण्यासाठी आदर्श शेती पद्धतीचा (Good Agricultural Practices) वापर ही काळाची गरज झाली आहे. बदलते हवामान, पिक पद्धतीनुसार किडींच्या प्रादुर्भाव बदलत आहे. अशा वेळी किडनाशकांचा वापर काटेकोर , समंजसपणे करायला हवा. तेंव्हाच आपल्या लोकांसाठी आरोग्यदायी अन्न पिकवणे आपल्याला शक्य होइल.


१.) किडनाशकांचा वापर अधिकृत (केंद्रीय कीडनाशक मंडळ व नोंदणी समिती) यांच्या शिफारशी नुसार करावा. शिफारस केलेला काढणीपुर्व काळ उलटल्यानंतर पिकाची काढणी करावी.

२.) ज्यावेळी इतर किड नियंत्रणाचे उपाय उपयूक्त ठरत नाहित, किडींचा प्रादुर्भाव नियंत्रणाच्या पुढे जातो, अशा वेळी शिफारशीनुसार रासायनिक कीडनाशकांचा वापर करावा.


३.) किडनाशकांचा वापर विशिष्ट दिवसानंतर न करता गरजेप्रमाणे, किडींचा प्रकार , किडीची अवस्था व त्यांची संख्या (ईटीएल) याचा आधार घेवुन करावा.

४.) किडनाशकांचा वापर करित असताना नविन प्रकारातील आणि कमी मात्रा लागत असलेल्या कीडनाशकांचा शिफारसी नुसार वापर करावा.

५.) ज्या किटनाशकांच्या उत्पादनावर लाल त्रिकोण आहे अशांचा वापर कमी ठेवावा. निळ्या किंवा हिरव्या रंगाच्या त्रिकोण असलेल्या किडनाशकांवर अधिक भर द्यावा.


No comments:

Post a Comment

Liked on YouTube: ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ

ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ #Dboss, #Kumarswamy, #Mandyaelection. Darshan fan latest v...