डाळिंब
डाळिंब पिकाचे चांगले उत्पादन व मालाचा दर्जा सुधारण्यासाठी त्याचे वर्षभर आदर्श व्यवस्थापन व पीक संरक्षण करणे गरजेचे आहे. त्या संदर्भात केलेले हे मार्गदर्शन
या गोष्टी महत्त्वाच्या -
* प्रत्येक बुरशीनाशक व कीटकनाशकाची शिफारशीत मात्रेतच फवारणी करावी. कमी किंवा जास्त तीव्रतेच्या फवारण्यांमुळे बुरशी वा किडींत प्रतिकारक्षमता वाढून त्यांचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते.
*फवारणी घेतांना सुडो,जैविका, मोलडाउन या जैविक बुरशीनाशकांचा तसेच बायोसार VBM,मेटाबेव्ह बिव्हेरिया,मेटाबेव्ह मेटाराइझम,जैविक किटकनाशकाचा मोठ्याप्रमाणात वापर करावा.
* सर्व फवारण्या गरजेनुसारच कराव्यात. अवाजवी फवारण्या तेलकट डाग, रोगांच्या वाढीस सहायक ठरतात.
* फवारणीपूर्वी फवारणीस वापरण्यात येणाऱ्या पाण्याचा सामू 7.0 च्या खाली आणणे आवश्यक आहे. त्यासाठी सायट्रिक ऍसिडचा वापर करावा.
* फवारण्यांची संख्या व तीव्रता मर्यादित असावी, अन्यथा झाडांमध्ये अंतर्गत विकृती निर्माण होतात.
* बोर्डोमिश्रण वगळता सर्व फवारण्यांमध्ये ट्रायबाँड स्टिकरचा वापर करावा.
* बोर्डोमिश्रण गरजेइतके बनवून ताबडतोब फवारावे.
* किडीमध्ये प्रतिकारक्षमता निर्माण न होण्याकरिता विविध कीडनाशकांचा आलटूनपालटून वापर करावा.
* फळांमधील कीडनाशकांचे अंश निर्धारित प्रमाणापेक्षा कमी राखण्यासाठी फळ तोडणीपूर्वीचा कालावधी लक्षात ठेवावा.
👉डाळिंबावरील किडी -
रसशोषक किडी -
1) मावा -
डाळिंबाचा बहार धरल्यानंतर नवीन पालवी फुटण्यास सुरवात होते. त्या वेळी कोवळ्या शेंड्यांवर, तसेच फुलावर मावा किडीचा प्रादुर्भाव दिसू लागतो. प्रादुर्भाव जर जास्त प्रमाणात झाला तर मावा किडीच्या तोंडातून चिकट द्रवाच्या स्रावामुळे शेंडे चिकट होऊन त्यावर, तसेच पानावर काळ्या बुरशीची वाढ होते. थंडीच्या हंगामात डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो.
2) फुलकिडे (थ्रिप्स) -
डाळिंबावरील फुलकिडीच्या पिवळ्या आणि काळ्या रंगाच्या अशा दोन प्रजाती आहेत. पिल्ले आणि प्रौढ किडे पानांवरील, कोवळ्या फांद्यांवरील पृष्ठभाग खरवडून त्यातून स्रवणाऱ्या रसावर उपजीविका करतात. फळांवर प्रादुर्भाव झाला असेल तर फळांचा पृष्ठभाग खरवडल्यामुळे त्यांचा आकर्षकपणा नाहीसा होऊन बाजारभाव कमी मिळतो.
3) पांढरी माशी -
पांढऱ्या माशीचे वास्तव्य पानांच्या मागील बाजूस असते. किडीची पिल्ले आणि प्रौढ माश्या राखाडी पांढऱ्या रंगाच्या असून, त्या समूहाने दिसून येतात. या किडीची पिल्ले पानातील पेशीद्रव्ये शोषतात, तर प्रौढ माशी कोवळ्या पानांतील पेशीद्रव्यांवर उपजीविका करतात. या किडीच्या माद्या पानांवर अतिसूक्ष्म अंडी घालतात आणि त्यापुढील जीवनक्रम झाडांच्या पानांवरच पूर्ण करतात.
4) पिठ्या ढेकूण (मिलिबग) -
पिठ्या ढेकूण या किडीचा प्रादुर्भाव उष्ण आणि कोरड्या हवामानात जास्त प्रमाणात होतो. किडीची पिल्ले आणि प्रौढ फळांवर, पानांतील पेशीद्रव्यांवर उपजीविका करतात.
मोठ्या प्रमाणात फळांवर प्रादुर्भाव झाला तर अशी फळे चिकट काळपट झाल्याने बाजारात विकण्यायोग्य राहत नाहीत.
5) कोळी (माइट्स) -
कोळीच्या लाल आणि पिवळ्या रंगाच्या दोन प्रजाती डाळिंबावर निदर्शनास येतात. पिल्ले आणि प्रौढ किडे पानांच्या खालच्या भागावर राहून पानांतील रस शोषून घेतात. परिणामी, पानांच्या वरील बाजूचा रंग विटकरी रंगासारखा दिसू लागतो. कालांतराने पूर्ण पाने विटकरी रंगाची होऊन वाळू लागतात आणि नंतर गळून पडतात.
ब) फळांवरील किडी -
1) फळ पोखरणारी अळी (सुरसा) -
पावसाळ्यात मृग बहारात ही कीड जास्त प्रमाणात असते. या किडीच्या अळ्या फळे पोखरून आतील भाग खातात व त्यांची विष्ठा फळांच्या पृष्ठभागावर आलेली दिसते. या किडीचा प्रादुर्भाव फुले लागण्याच्या वेळेस सुरू होतो. नियंत्रण फुलोऱ्याच्या अवस्थेपासून सुरवात करणे आवश्यक ठरते.
2) डाळिंबावरील रस शोषणारा पतंग -
पतंग दिसायला आकर्षक असतात. त्यांच्या मोठ्या आकारावरून आणि रंगावरून ते सहजपणे ओळखू येतात. या किडीचा जीवनक्रम जंगली वनस्पतींवर ओढ्यांच्या, नाल्यांच्या बाजूला होत असतो. पतंग रात्रीच्या वेळी फळांवर प्रादुर्भाव करतात. म्हणून त्यांचे नियंत्रण कठीण असते. सर्वसाधारणपणे रात्री 8 ते 11 च्या दरम्यान या पतंगांचे प्रमाण जास्त प्रमाणात दिसून येते. पतंग बागेत आल्यानंतर पक्व फळांत सोंडेने तोंड खुपसून सूक्ष्म छिद्र पाडून आतील रस शोषून त्यावर उपजीविका करतात. छिद्र पाडलेल्या जागेवर गोलाकार चट्टा तयार होतो आणि त्या जागी फळ सडण्यास सुरवात होते. अशी प्रादुर्भाव झालेली फळे गळून पडतात. या पतंगाचा प्रादुर्भाव ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत जास्त प्रमाणात असतो. कारण पावसाळी हवामानात या किडीचे पतंग बाहेर पडतात
.
क) खोड व फांद्यांवरील किडी -
1) झाडांची साल खाणारी अळी (इंडरबेला) आणि खोडकिडा -
जुन्या, तसेच दुर्लक्षित बागेत या किडींचे प्रमाण जास्त असते. साल खाणारी अळी ही खोड व फांद्याच्या बेचक्यात छिद्र पाडून त्यात राहते. अळीची विष्ठा, तसेच चघळलेला लाकडाचा भुसा जाळीच्या स्वरूपात प्रादुर्भाव झालेल्या भागावर लटकलेला दिसतो. अळी काळपट रंगाची असून, पूर्ण वाढलेली अळी 3 ते 4 सें.मी. लांब असते. खोडकिड्याची अळी मात्र पांढरी, जाड व तिचा डोक्यावरील भाग रुंद असतो. ती खोड व फांद्यांचा आतील भाग पोखरून खाते. या किडीची तीव्रता जास्त असल्यास प्रथम फांद्या वाळतात व नंतर संपूर्ण झाड वाळते.
2) खोडाला लहान छिद्रे पाडणारे भुंगेरे (शॉर्ट होल बोअर) -
या किडीचे भुंगेरे काळपट रंगाचे असून, आकाराने अत्यंत लहान म्हणजे 2 ते 3 मि. मी. लांबीचे असतात. किडीच्या अंडी, अळी, कोष व भुंगेरे या अवस्था खोडातच आढळून येतात.
भुंगेरे खोडाला सूक्ष्म छिद्रे पाडून आतील भाग पोखरतात. अळीसुद्धा आतील भाग पोखरते. पोखरलेले झाड पिवळे पडून वाळण्यास सुरवात होते. प्रादुर्भाव झालेल्या जागी लहान छिद्रांमधून भुसा बाहेर आलेला असतो. ही कीड जमिनीलगतच्या मुळांवर व खोडावर, तसेच फांद्यांवर जास्त प्रमाणात दिसून येते.
उपाययोजना:-
जैविक पध्दतीने नियंत्रण करण्यासाठी बायोसारvbm,मेटाबेव्ह मेटारायझम, मेटाबेव्ह बिव्हेरिया,बायोसार इ.औषधाची फवारणी करत राहावे.
ड) मुळांवर गाठी करणारे सूत्रकृमी (रूट नॉट निमॅटोड) -
सूत्रकृमी ही अतिसूक्ष्म कीड असून, ती साध्या डोळ्यांनी दिसून येत नाही. सूत्रकृमीची मादी मुळांच्या अंतर्गत भागावर राहून मुळातील अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे मुळांवर गाठी निर्माण होतात. या गाठींमुळे अन्नरस वहनात बाधा तयार होते. दिलेली अन्नद्रव्ये झाडास उपलब्ध होत नाहीत
उपाययोजना:-निमँटोनाशक हे औषध प्रती एकर 2 ली.गुळ 2kg घेऊन100ली.पाणी यामध्ये रात्रभर भिजवून ड्रिपने द्यावे.
डाळिंबावरील रोग -
प्रामुख्याने खालीलप्रमाणे रोग व त्यांची लक्षणे दिसून येतात-
अ) कोलेटोट्रीकम बुरशी -
पानांवर पडणारे ठिपके आकारात लहान, तपकिरी काळपट व मध्यभागी फिकट रंगाचे असतात. ठिपक्यांच्या कडा जांभळट तपकिरी रंगाच्या असतात. हे कालांतराने वाढत जाऊन त्यांच्या कडा गर्द रंगाच्या होतात. प्रादुर्भाव जास्त वाढल्यास हे ठिपके खवल्यासारखे होतात. रोगाच्या वाढीस जास्त तापमान व अति आर्द्रता असणारे वातावरण पोषक ठरते.
ब) सरकोस्पोरा बुरशी -
या बुरशीच्या प्रादुर्भावामुळे पानांवर वेडेवाकडे, लहान आकाराचे तपकिरी रंगाचे ठिपके पडतात. त्याची संख्या कमी अथवा जास्तही असू शकते. ठिपके फार मोठ्या प्रमाणात असूनही एकमेकांत मिसळत नाहीत व प्रत्येक ठिपका स्वतंत्ररीत्या ओळखता येतो.
क) अल्टरनेरिया बुरशी -
या बुरशीमुळे पानांवर वेगवेगळे, वेडेवाकडे, गोलसर तपकिरी काळपट रंगाचे ठिपके दिसतात. कालांतराने ठिपके मोठे होऊन पूर्ण पानावर पसरतात. पाने करपल्यासारखी दिसतात. लागण झालेली पाने पिवळी पडतात, वाळतात व गळून जातात. सुरवातीस फळांवर लहान तपकिरी रंगाचे वेडेवाकडे ठिपके दिसतात. पुढे हे ठिपके लालसर, गर्द तपकिरी किंवा काळपट तपकिरी रंगाचे होतात. अल्टरनेरिया बुरशीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने परिपक्व होत असलेल्या फळांवर जास्त आढळतो. झाडे ताण अवस्थेत असताना या रोगास बळी पडतात.
ड) ड्रेचलस्लेरा बुरशी
या बुरशीची लक्षणे पानांवर न दिसता फक्त फळांवरच दिसतात. फळावरील ठिपक्यामुळे फळांची गुणवत्ता निकृष्ट दर्जाची होते व अशा फळांना बाजारभाव कमी मिळतो. हे टाळण्याकरिता फवारणी वेळापत्रकाचे व्यवस्थित पालन करणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळा असे दिसून आले आहे, की मुख्य फळपीक तोडून बाजारपेठेत घेऊन गेल्यानंतर बागेकडे दुर्लक्ष होते व फवारणी करणे टाळली जाते. त्यामुळे बागेत राहिलेल्या रोगग्रस्त फळांवरील बुरशी तशीच राहते व येणाऱ्या काळात पोषक वातावरण मिळताच वाढते. म्हणून अशी बुरशी नष्ट करण्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
इ) मर रोग (खोडकूज व मूळकूज) -
झाडांच्या बुंध्यांजवळ सतत ओलावा राहून साल कुजते व रायझोक्टोनिया आणि स्क्लेरोशियम या बुरशींचा प्रादुर्भाव होतो. या रोगाची लागण झालेल्या झाडाच्या काही फांद्यांवरील पाने पिवळी पडतात व वाळतात. लागण झालेल्या फांदीवरील फळेसुद्धा वाळून जातात व झाडावर लटकून राहतात. कालांतराने झाड पूर्णपणे वाळते. लागण झालेले झाड उभे चिरले असता खोडाच्या गाभ्याचा रंग निळसर काळा झालेला दिसतो. सेरॅटोसिस्टोम किम्ब्रियाटा, मॅक्रोमोमिना या बुरशींचाही प्रादुर्भाव झाडांच्या मुळावर झालेला दिसतो.
ई) जिवाणुजन्य तेलकट डाग -
रोगांचा प्रादुर्भाव पाने, फुले, फांद्या, फळे या भागांवर होतो, हा रोग जिवाणुजन्य असून, झान्थोमोनोस या जिवाणूमुळे होतो. पानावर तेलकट डाग दिसून येतात. हे डाग कालांतराने काळपट होऊन डागांभोवती पिवळे गोलाकार वलय उन्हात बघितल्यावर स्पष्ट दिसून येतात. फुलांवर काळपट डाग, खोडांवर तपकिरी रंगाचे डाग, शेवटी गर्डलिंग किंवा खाचेसारखे व्रण तयार होऊन फांदी मोडते. फळांवरील प्रादुर्भावाने डाग एकत्र येऊन आडवे व उभे तडे दिसतात व फळांची गळ होते.
प्रादुर्भावास अनुकूल बाबी -
बागेतील अस्वच्छता, झाडांची गर्दी, परिसरामध्ये तेलकट डागांचा प्रादुर्भाव, सूर्यप्रकाशाचा अभाव, ढगाळ, पावसाळी व वादळी पाऊस, वातावरणातील जास्त आर्द्रता, रोगग्रस्त गुटी रोपांचा लागवडीत वापर, आदी.
डाळिंबावरील तेलकट डाग रोग नियंत्रणासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संशोधित केलेले वेळापत्रक -
1) मागील हंगामात संपूर्ण फळे काढणी झाल्यानंतर झान्थोनाशक (ब्रोमोपॉल) 50 ग्रॅम + कॅप्टन 500 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यातून फवारावे.
2) फळांची काढणी झाल्यानंतर बागेला तीन महिने विश्रांती द्यावी.
3) बहार धरण्याअगोदर 15 दिवस झाडांच्या आकारानुसार 6 इंच खोल जमिनीची चाळणी करून घ्यावी आणि त्यासोबत झाडाच्या डेऱ्याच्या बाहेरील बाजूने 9 इंच खोल, 6 इंच रुंद खोली घेऊन मुळांची छाटणी करावी.व बेसल डोस बायोव्हिजन(सेंद्रिय खत)-1kg 10:26:26-500ग्रँम, सप्लींमेट-500ग्रँम, अर्कोमीन-150ग्रँम, हुमिसोलG-50ग्रँम,फोरेट-25ग्रँम,निमँटोनाशक/जैविका/बायोमिक्स-25ग्रँम प्रती झाडालामिश्रण करून रिंग पध्दतीने द्यावे.
4) बहार घेण्यापूर्वी संपूर्ण पानगळ करण्यासाठी इथेफॉन 2 मि. लि. प्रति लिटर) या प्रमाणात फवारणी करावी. रोगट फांद्यांची छाटणी करावी व झाडांची मुळे 15 दिवस सूर्यप्रकाशात उघडी करून ठेवावीत.
5) पानगळ आणि छाटणीनंतर झान्थोनाशक 50 ग्रॅम + कॅप्टन 250 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यातून फवारावे.
6) खाली पडलेले संपूर्ण पाने व छाटलेले रोगट अवशेष गोळा करून जाळून टाकावेत.
7) बागेत जमिनीवर ब्लिचिंग पावडर (60 किलो प्रति हेक्टर) किंवा कॉपर डस्ट 4 टक्के (20 किलो प्रति हेक्टर) या प्रमाणात धुरळणी करावी.
8) झाडांच्या खोडाला निम्बिका प्लस + झान्थोनाशक 50 ग्रॅम + कॅप्टन 500 ग्रॅम प्रति 100 लिटर पाणी या मिश्रणाची फवारणी करावी.
9)सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करून मग रासायनिक खतांची मात्रा द्यावी.
10) नवीन पालवी फुटल्यानंतर झान्थोनाशक 25 ग्रॅम किंवा आर.बि. बोर्डोमिश्रण 1 टक्का किंवा कॅप्टन 250 ग्रॅम प्रति 100 लिटर पाणी फवारावे. पानांवर आणि फळांवर रोगाचा प्रादुर्भाव दिसत असेल तर 10 ते 12 दिवसांनी फवारणी करावी आणि रोग नसेल तर 30 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
11) झाडाची प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी पानांची वाढ होत असताना फंटा, 0-52-34 हे विद्राव्य खत कॅल्शिअम नायट्रेट आणि अर्कोमीन गोल्ड 1ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात घेऊन 5 ते 6 दिवसांनी आलटूनपालटून 7-8 फवारण्या कराव्यात.
12) कीडनाशकांची फवारणी फळ काढणीच्या 30 दिवस पूर्वी बंद करावी. व सुडो"+जैविका, सुडोFL+मोलडाउन या जैविक औषधाची फवारणी फळ काढणीपर्यंत करावी.
डाळिंब आदर्श व्यवस्थापनातील काही ठळक बाबी -
* विद्यापीठाने शिफारस केलेल्या अंतरावरच डाळिंबाची लागवड करा.
* प्रथम सरकारमान्य लँब शेत जमिन मिमांसा प्रयोगशाळा सटाणा मो.नं-8805613418 यांच्या कडुन माती परिक्षण करून घ्यावे.परीक्षणानुसार अन्नद्रव्याची मात्रा द्या.
* सूत्रकृमी परीक्षण नियमित व अवश्य करा.
* एकात्मिक कीड-रोग व्यवस्थापन व एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करून झाड सशक्त करून झाडामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण करा.
* अन्नद्रव्ये व्यवस्थापन मातीच्या पृथक्करण अहवालाच्या आधारे करा.
* पाणी नियोजन झाडाच्या गरजेनुसार वाफसा आल्यावरच करा.
* झाड सुप्तावस्थेत असताना
अ)0:52:34-5gm+अर्कोमीन गोल्ड-1gm,
ब)आर.बि.बोर्डो-5gm+झान्थोनाशक-0.5gmया दोन फवारण्या 15 दिवसाच्या अंतराने आलटून पालटून घेत राहवे. तसेच झाडाची विशेष काळजी घ्या.
* झाडाच्या वयानुसार झाडावर फळांची संख्या ठेवा.
* कीड व रोग नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा.
* उपलब्ध परिस्थितीनुसार कोणताही एकच बहार घ्या.
* एक गाव एक बहार ही संकल्पना राबवा.
* समूह पद्धतीने आदर्श व्यवस्थापन पद्धती राबवा.

No comments:
Post a Comment