Wednesday, 2 May 2018

नैसर्गिक ऊस शेतीची आश्चर्यचकित करणारी वैशिष्ट्य .

नैसर्गिक ऊस शेतीची आश्चर्यचकित करणारी वैशिष्ट्य -

1.झिरो बजेट नैसर्गिक शेतीत उसाची कमीत कमी  8×2 फूट अंतरावर लागवड केली जाते. रासायनिक शेतीत जास्तीत जास्त पाच बाय दोन फुटावर लागवड केली जाते.
2.एका एकरात फक्त 2722 डोळे लागतात.म्हणजे फक्त 200 उसामध्ये 1 एक्करची लागवड पूर्ण होते .म्हणजे बेण्याचा खर्च जास्तीत जास्त 1500 रुपये होतो. रासायनिक शेतीत बेण्यासाठी नऊ हजार रुपये पेक्षा जास्त खर्च येतो.
3.नैसर्गिक शेती करणारा एकही शेतकरी पाचट जाळत नाही.रासायनिक शेती करणारी 80 टक्के शेतकरी पाचट जाळतात.
4.फक्त 20% पाणी लागते.खोल मुळ्या,आच्छादन,यामुळे एक महिन्यापर्यंत ऊस तग धरू शकतो. दर दहा दिवसाला पाणी द्यावे लागते. ऊस ताणल्यास उत्पादनात मोठी घट होते.
5. भरपूर सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे प्रत्येक ऊस समान जाडीचा व उंचीचा असतो.रासायनिक शेतीत अंगठ्यापेक्षाही लहान ऊस मोठया प्रमाणात पहायला मिळतात.
6.मुळ्यांची वाढ 4 फूट खोल व लांब होते.म्हणजे उसात जास्त दमदारपणा असतो.
7.उसाची उंची 15 ते 20 फुटांपर्यंत जाते., प्रत्येक उसाचे वजन तीन ते पाच किलोपर्यंत मिळते. रासायनिक शेती मोठ्या प्रमाणात अपरिपक्व ऊस आढळतात.
8.प्रत्येक फुटव्यांचे उसात रूपांतर होते.रासायनिक शेतीत फक्त 25% फुटव्यांचे उसात रूपांतर होते. बाकी 75% फुटवे सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे मरून जातात.
9. खोडवा ऊसाला उत्पादन कमी होत नाही. रासायनिक शेतीत 20 ते 30 टक्के उत्पादनात घट होते.
10. वर्षभरात आंतरपिकांतून कमीतकमी तीस हजारापर्यंत चे उत्पादन मिळते. रासायनिक शेतीत आंतरपिके घेतली जात नाहीत.
11.पहिल्या वर्षीपासूनच रासायनिक शेतीपेक्षा जास्त उत्पादन मिळते.
12.रासायनिक खतासाठी लागणाऱ्या दहा ते पंधरा हजार रुपयांची बचत होते .
13. नैसर्गिक शेतीत एकही ऊस पडत नाही. रासायनिक शेतीतील एकही ऊस उभा राहत नाही.
14.कुठलीही कीड व रोग येत नाही.
15.जमिनीच्या सुपिकतेत वाढ होते.रासायनिक शेतीत मोठ्या प्रमाणात जमीन खराब होते.
16.कुठल्याही प्रकारची मशागत न करताही गांडुळांमुळे जमीन भुसभुशीत रहाते.रासायनिक शेतीत जमीन कडक बनते.


No comments:

Post a Comment

Liked on YouTube: ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ

ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ #Dboss, #Kumarswamy, #Mandyaelection. Darshan fan latest v...