हुमणी.
खुप मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान करते .
ऊस लागणी पासुनच उपाय योजणे आवश्यक आहे .
साधारण मे जुन मध्ये हुमणीच्या अळ्या अंड्यातुन बाहेर पडतात . त्यावेळी आपण मेटारायझियम व बिव्हेरिया सारख्या बुरशी सोडत होतो . काही दिवसानी हुमणी आणखिन दिसली की क्लोरो व सायफर मिक्स सोडत होतो . तरीही आटोक्यात नाही आली तर मग स्टॉंग डोस म्हणुन लेसेंटा किंवा तत्सम औषधे वापरीत होतो .
हुमणी मोठी दिसली की लेसेंटाची आळवणी सांगीतली जायची , पण ऊस मोठा आला आणि पडला असेल तर फार अडचन होते .
तरीही ज्या प्लॉट मध्ये आळवणी करता येते तेथे *लेसेंटा आणि डेसीस 100* मिसळुन आळवणी केलेस रिझल्ट येतात .
ऊस लागण केल्यानंतर दहा दिवसानी *लेंसेंटा* 150 ग्रॅमची आळवणी केल्यास पुढे होणारा हुमणीचा त्रास फार आटोक्यात रहातो.
No comments:
Post a Comment