Sunday, 25 March 2018

शेततळ्यातील हानिकारक शेवाळ व जिवाणू.

शेततळ्यातील हानिकारक शेवाळ व जिवाणू


  •   फळ बागांना उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई पडू नये म्हणून देशात शेत तळे निर्माण झाले आहेत. व पाण्याचे नियोजन त्यामुळे शेतीसाठी झाले.

साठवलेले पाणी शेत तळ्यामध्ये उन्हाळ्यात शेवाळ वाढल्यामुळे खराब होते. पाण्याला दुर्गन्धी सुटते. हे बहुतांश शेतकऱ्यांना माहिती असले  तरी ते   शेतीसाठी किती उपयुक्त व फायदेशीर ठरते, हा प्रश्न विचारल्यास त्याचे उत्तर हे पाणी हानिकारक ठरत आहे असेच येते. साठवलेल्या पाण्यात शेवाळ व इतर वनस्पती वाढून अनेक प्रकारच्या बॅक्टरीया पाण्यात वाढतात. व ते पाणी पिण्यास प्रतिबंधित केले जाते. अगदी अशा पाण्यामुळे फळ पिके , ऊस यांच्या मुळाची वाढ खुंटते. व एप्रिल - मे महिन्यात  याचे दुष्परिणाम ऊसा सारख्या पिकात दिसून येतात. या दोन महिन्यात ऊस निस्तेज होतो. तर डाळिंब पिकात कुपोषणामुळे अनेक पिकांचा फैलाव , मररोग असे चित्र दिसून येते.
अश्वमेध संशोधित इकोफ्रेश च्या वापरामुळे शेवाळावर काही अंश तात्काळ नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे , त्यामुळे पाण्यातील हानिकारक जिवाणूंचे प्रमाण थांबवता येते व पाणी स्वच्छ ठेवता येते. एक ते पाच लाख लिटर पाण्यासाठी इकोफ्रेश १ लिटर शेततळ्यात चार कोपऱ्यांना सोडून पाणी ढवळून घेतल्यास १० ते १५ दिवसात पाणी स्वच्छ होण्यास सुरवात होते व साठवलेल्या पाण्यामुळे शेतीचे होणारे नुकसान नियंत्रणात आणता येते.


No comments:

Post a Comment

Liked on YouTube: ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ

ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ #Dboss, #Kumarswamy, #Mandyaelection. Darshan fan latest v...